पुण्यात थंडीचा कडाका वाढणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुण्यात थंडीचा कडाका वाढणार
पुण्यात थंडीचा कडाका वाढणार

पुण्यात थंडीचा कडाका वाढणार

sakal_logo
By

पुणे, ता. ११ : पुणे शहर आणि परिसरात थंडीचा कडाका वाढणार आहे. शहरातील किमान तापमान १० अशांच्या खाली जाण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे.
शुक्रवारी (ता. १०) शहरात ११.४ अंश सेल्सिअस नोंदले गेले. सध्या दिवस उन्हाचे चटके तर रात्री आणि पहाटे गारठा वाढला आहे. तर रविवारपासून (ता. १२) शहरात किमान तापमान हे १० अंश सेल्सिअसपेक्षा कमी नोंदले जाऊ शकते. परिणामी थंडीत वाढ होण्याची शक्यता आहे. ही स्थिती येत्या गुरुवारपर्यंत (ता. १६) अशीच कायम राहू शकते. तसेच या कालावधीत जिल्ह्यातील इतर ठिकाणी ही पारा एक ते १३ अंशाच्या दरम्यान असेल.
सध्या किमान तापमानात काहीशी वाढ झाल्याने राज्यात गारठा ही कमी झाला आहे. त्यात कमाल तापमान हो ३४ अंशाच्या वर असल्याने दिवस उन्हाची झळ बसत आहे. तर शुक्रवारी (ता. १०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये रत्नागिरी येथे देशातील उच्चांकी ३७.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मात्र, उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानातील घट कायम आहे. शुक्रवारी राज्यातील नीचांकी तापमानाची नोंद निफाड येथे ९.५ अंश सेल्सिअस इतकी झाली. विदर्भात ही तापमानात सरासरीच्या तुलनेत घट कायम असली तरी किमान तापमान हे १२ अंशाच्या वर होते. हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार किमान तापमानातील पुढील दोन दिवस अशीच कायम राहणार असून त्यानंतर पारा पुन्हा घसरण्याचा अंदाज आहे.