गजानन महाराजांच्या प्रकटदिनी सांस्कृतिक महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गजानन महाराजांच्या 
प्रकटदिनी सांस्कृतिक महोत्सव
गजानन महाराजांच्या प्रकटदिनी सांस्कृतिक महोत्सव

गजानन महाराजांच्या प्रकटदिनी सांस्कृतिक महोत्सव

sakal_logo
By

धनकवडी, ता. १३ : संतश्रेष्ठ श्री गजानन महाराज यांच्या १४५ व्या प्रकटदिनानिमित्त सहकारनगर येथील श्री गजानन महाराज (शेगांव) सेवा प्रतिष्ठानतर्फे मंदिरात सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी सकाळी सात वाजता महाराजांचा महाअभिषेक करून पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. मंदिरापासून दत्तवाडी पोलिस स्टेशन मार्गे राम मंदिर, हरिहरेश्वर मंदिर आणि मंदिराच्या प्रांगण पालखी प्रदक्षिणा सोहळा झाला. यानंतर अध्ययन वाचन आणि आरती करण्यात आली. तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

या महोत्सवाअंतर्गत गेली आठ दिवस मंदिरात विविध कार्यक्रम झाले. त्यात पहिल्या दिवशी नर्मदानंदजी महाराज यांचे ‘गुरु ब्रह्म रूप जानो शिवकरूप जानो’ याविषयावर सत्संग झाले. त्यानंतर लता दीदींच्या गाण्यांची मैफल, महाराष्ट्राची लोकगाणी, कविता गझल आणि गप्पांचा कार्यक्रम, तीर्थ शिवराय कार्यक्रम, दिग्दर्शक अशोक पत्की प्रस्तुत ‘सप्तसूर माझे’ गाण्याचा कार्यक्रम, पंडित रघुनाथ पंशिकर यांचा ‘अवघा रंग एक झाला’, त्यानंतर गजानन विजय ग्रंथ सुश्राव्य संगीत पारायणाने महोत्सवाची सांगता झाली. सोमवारी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त विविध फुलांनी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच महाराजांभोवती रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात आली होती. ‘गण गण गणात बोते’ असाच आवाज सोमवारी दिवसभर मंदिरात घुमत होता. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते महाराजांची आरती झाली. कार्यक्रमांचे आयोजन मंदिर प्रतिष्ठानचे अध्यक्ष भारत पवार, उपाध्यक्ष सुधीर पुरंदरे, सचिव प्रताप बाठे, खजिनदार पौर्णिमा पवार, नरेंद्र बाकले, सुचिता गजेंद्रगडकर, योगेश पावशे, संजय पोमण, अनंत खर्चे, सुभाष जिर्गे आदी मंदिरातील सेवेकरी यांनी केले.

सहकारनगर ः श्री गजानन महाराज यांच्या १४५ व्या प्रकट दिनानिमित्त मंदिरात दर्शनासाठी सकाळपासून भाविकांची झालेली गर्दी.