किरकोळ व्यक्तींचे महत्त्व का वाढवावे? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किरकोळ व्यक्तींचे
महत्त्व का वाढवावे?
किरकोळ व्यक्तींचे महत्त्व का वाढवावे?

किरकोळ व्यक्तींचे महत्त्व का वाढवावे?

sakal_logo
By

पुणे, ता. १७ : राज्यातील सत्ता स्थापनेच्या वेळी घेण्यात आलेल्या पहाटेच्या शपथविधीबाबतच्या किरकोळ व्यक्तींच्या वक्तव्याबाबत बोलून त्यांचे महत्त्व वाढवावे, असे मला वाटत नसल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांना अप्रत्यक्षपणे खोचक टोला लगावला.
पहाटेचा शपथविधी होऊन बराच कालावधी लोटला आहे. मग फडणवीस यांनी इतक्या उशिरा हा मुद्दा का उपस्थित केला, असा प्रश्न विचारला असता, याबाबत त्यांनाच (फडणवीस) विचारायची गरज असल्याचेही पवार यांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासोबत घेण्यात आलेल्या पहाटेच्या शपथविधीबाबत शरद‌ पवार यांच्याशी चर्चा केली होती, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना फडणवीस हे असत्य माणूस असल्याचे वक्तव्य पवार यांनी केले होते. त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे दोन दिवसांपूर्वी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी पुण्यात आले होते. यावेळी फडणवीस यांनी पहाटेच्या शपथविधीबाबत मी जे काही बोललो ते पूर्ण सत्य नाही. अर्धेच बोललो. वेळ आल्यावर पूर्ण बोलेन, असे फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले होते.
दरम्यान, कसबा पोटनिवडणुकीच्या रिंगणात असलेले उमेदवार मला भेटून गेले. त्यांनी मला एखादी चक्कर टाका, अशी विनंती केली. परंतु आता एका ठिकाणी गेले की दोन्ही ठिकाणी जावं लागेल. बारा ज्योतिर्लिंग कुठे आहेत, हे सर्व देशाला माहिती आहे. अशा बाबतीत ज्योतिर्लिंगाची जागा बदलणे म्हणजे काय सांगायचं, असे म्हणत
मुख्य विषय बदलण्यासाठी हे विषय काढले जातात, असे पवार यांनी सांगितले.