‘आर अँड डीई’च्या संचालकपदी डॉ. जोशी

‘आर अँड डीई’च्या संचालकपदी डॉ. जोशी

पुणे, ता. १ : संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) दिघी येथील संशोधन आणि विकास आस्थापना (अभियंता) या प्रयोगशाळेच्या संचालकपदी डॉ. मकरंद जोशी यांची नियुक्ती झाली असून, त्यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला.

‘आर अँड डीई’चे पूर्वीचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यावर पाकिस्तानला संरक्षण क्षेत्रातील गोपनीय माहिती पुरविल्याच्या आरोप असून, या प्रकरणी दहशतवादविरोधी पथका (एटीएस)ने त्यांना अटक केली आहे. त्यानंतर संचालकपदाची जागा अद्याप रिक्त होती.

डॉ. जोशी यांनी अमेरिकेतील क्लेमसन विद्यापीठातून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी. प्राप्त केली आहे. ते ऑगस्ट २००० मध्ये आर अँड डीई (अभियंता) या प्रयोगशाळेत रुजू झाले. आर अँड डीईमध्ये विविध तंत्रज्ञान, प्रक्रिया आणि उत्पादने विकसित करण्यात त्यांनी विशेष योगदान दिले आहे.

आर अँड डीई (अभियंता)ची स्थापना सहा दशकांपूर्वी करण्यात आली असून, ही एक प्रमुख अभियांत्रिकी प्रयोगशाळा आहे. याद्वारे भारतीय सशस्त्र दलांसाठी विविध अभियांत्रिकी प्रणालींच्या विकासावर भर देण्यात येत आहे. या प्रयोगशाळेद्वारे लष्करासाठी लढाऊ अभियांत्रिकी प्रणालीही विकसित करण्यात आली आहे. त्यामध्ये ब्रिजिंग सिस्टिम, विस्फोटक प्रणाली, लाँचर्स आणि ग्राउंड सपोर्ट सिस्टिम आदींचा यात समावेश आहे. संमिश्र उत्पादने, रोबोटिक प्रणाली आणि मायक्रो-इलेक्ट्रो-मेकॅनिकल-सिस्टम्स (एमईएमएस) विकसित करण्याच्या क्षेत्रात ही प्रयोगशाळा अग्रगण्य आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com