Pune
Punesakal

Pune : विद्यार्थ्यांनी ‘प्लॅन बी‘ सुद्धा तयार ठेवावा वंदना चव्हाण यांचा स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांना सल्ला

त्यात जास्त संख्या एमपीएससी आणि यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्यांची आहे. त्यामुळे पुणे हे ''स्पर्धा परीक्षा अभ्यासिका हब'' झाले आहे.

Pune - "स्पर्धा परीक्षा देत विद्यार्थ्यांनी त्यात यश मिळवावेच, मात्र ''प्लॅन बी'' सुद्धा तयार ठेवावा,‘ असा सल्ला खासदार वंदना चव्हाण यांनी दिला.
क्रांती चॅरिटेबल ट्रस्ट संचालित क्रांतीअग्रणी अभ्यासिकेतर्फे सदाशिव पेठेतील फडके हॉल येथे नवे स्पर्धा परीक्षा अभ्यासिका केंद्र सुरु करण्यात आले. त्याचे उद्घाटन करताना वंदना चव्हाण म्हणाल्या की, पुणे हे विद्येचे माहेरघर असून येथे विविध प्रकारचे शिक्षण घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून तसेच इतर राज्यांतूनही विद्यार्थी येत असतात.

Pune
Pune : बारामतीच्या किशोर भापकर यांना किर्लोस्कर आयकॉन पुरस्कार

त्यात जास्त संख्या एमपीएससी आणि यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्यांची आहे. त्यामुळे पुणे हे ''स्पर्धा परीक्षा अभ्यासिका हब'' झाले आहे. त्यात सदाशिव पेठेसारख्या ठिकाणी नवी अभ्यासिका सुरू होणे विद्यार्थ्यांच्या सोयीचे ठरले आहे. अभ्यासिकेत स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त चर्चासत्र, उत्तमोत्तम वक्त्यांची भाषणे असे उपक्रम आयोजित करणे महत्त्वाचे आहे.

याप्रसंगी पुणे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, जिल्हा परिषद गटनेते शरद लाड, राष्ट्रवादीचे पुणे ग्रामीण अध्यक्ष प्रदीप गारटकर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष रविकांत वर्पे, एमपीएससी समितीचे प्रमुख किरण निंभोरे, नीलेश गायकवाड, बळिराम डोळे यांच्यासह विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Pune
Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्गावर वनविभाग व रेस्क्यू टीमने मगरीला सुखरूप सोडले अधिवासात

कार्यक्रमात सेट परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
अरुण लाड म्हणाले, "प्रत्येक जिल्ह्यात अभ्यासिका सुरू करण्याचा मानस आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या मुलांची संख्या जास्त आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून पुण्यात अभ्यास करण्यासाठी अभ्यासिका सुरू करून अत्याधुनिक सुविधा मान्यवरांचे मार्गदर्शनपर चर्चासत्रे आयोजित केली जातील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com