

पुणे, ता. १८ : संशोधन आणि विकास संस्थेचे संचालक वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रदीप कुरुलकर याने न्यायालयात जामिनासाठी केलेल्या अर्जावर सरकारी पक्षाने २५ ऑगस्टला उत्तर दाखल करावे, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. मागील चार महिन्यांपासून कारागृहात असलेल्या डॉ. कुरुलकरने जामिनासाठी केलेल्या अर्जावर विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयासमोर शुक्रवारी सुनावणी झाली. सुनावणीदरम्यान कुरुलकर हा व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे हजर झाला. जामीन अर्जावर लेखी जबाब सादर करण्यास सांगितले होते. सरकारी वकील आणि ‘एटीएस’ अधिकाऱ्यांनी न्यायालयाकडे वेळ मागितला. मात्र ॲड. ऋषिकेश गानू यांनी या मागणीला विरोध दर्शविला. या प्रकरणात सात जुलैला दोषारोपपत्र दाखल केले आहे. ‘एटीएस’ला पुरेसा वेळ मिळाला आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला. आरोपी मे महिन्यापासून कारागृहात असून, जुलैमध्ये आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र दाखल झाले आहे. त्यामुळे सरकारी वकिलांना मुदत देणे योग्य होणार नसल्याचा युक्तिवाद बचाव पक्षाने केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.