राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार प्रस्तावांसाठी मुदतवाढ

राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार प्रस्तावांसाठी मुदतवाढ

पुणे, ता. २१ : पंतप्रधान राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कारासाठी प्रस्ताव दाखल करण्यास केंद्र सरकारने मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे या पुरस्कारासाठी पात्र असलेल्या बालकांना येत्या ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन पद्धतीने प्रस्ताव सादर करता येणार आहे.
केंद्रीय महिला व बालविकास विभागाच्या वतीने पंतप्रधान राष्ट्रीय बालशौर्य पुरस्कार दिला जातो. कोणत्याही बालकाने स्वतःच्या जिवाला धोका असताना अतुलनीय धैर्याने आणि प्रतिकूल नैसर्गिक किंवा मानवनिर्मित परिस्थितीविरुद्ध धाडसाने केलेल्या निःस्वार्थ सेवेबद्दल हा पुरस्कार दिला जातो.
तसेच, स्वतःला किंवा समाजासाठी गंभीर धोक्याच्या वेळी मानसिक शक्ती, तीव्र व शीघ्र बुद्धी आणि समयसूचकता अशी अपवादात्मक कृती करणाऱ्या बालकांना त्यांच्या शौर्यासाठी बाल पुरस्कार दिला जातो. याशिवाय खेळ, समाजसेवा, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरण, कला आणि संस्कृती, नावीन्यपूर्ण उपक्रम आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या बालकांनाही हा पुरस्कार दिला जातो, असे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी मोनिका रंधवे यांनी सांगितले.
याबाबतच्या अधिक माहितीसाठी https://awards.gov.in या संकेतस्थळाला भेट देण्याचे आवाहन रंधवे यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com