

पुणे, ता. ३ : किरकोळ वादातून मित्राचा खून करणाऱ्या तरुणास हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. मित्राचा खून केल्यानंतर तरुणाने नातेवाईकावर चाकूने वार केले. एकाच दिवशी खून आणि खूनाचा प्रयत्न असे दोन गुन्हे करून पसार झालेल्या तरुणाला पोलिसांनी अटक केली.
शुभम काकासाहेब निखळ (वय २७, रा. होळकरवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. निखळ याचा मित्र बाळू कांबळे चंदननगर भागात राहायला होता. निखळ आणि कांबळे पूर्वी एके ठिकाणी काम करायचे. त्यांची मैत्री होती. कोरोना संसर्ग काळात निखळची नोकरी गेली. कांबळेला भेटायला निखळ गेला होता. त्यांच्यात वाद झाल्याने कांबळेने त्याला मारहाण केली होती. मारहाण केल्याने तो चिडला होता. त्यानंतर शुक्रवारी (ता.१) खराडी भागात निखळ गेला. त्याने कांबळेला बोलावून घेतले. रिव्हरडेल सोसायटीजवळ त्याने कांबळे याच्यावर कुऱ्हाडीने वार केला. नदीपात्रात कांबळे मृतावस्थेत सापडल्यानंतर चंदननगर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल केला होता, अशी माहिती हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिली.
मित्राचा खून करून निखळ शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास मगरपट्टा भागात राहणारे नातेवाईक राहुल काळे (वय ३९) यांना भेटायला गेला. निखळचे काळे यांच्याशी वाद झाले होते. काळे यांना इमारतीच्या परिसरात त्याने बोलावून घेतले. त्यांच्या गळ्यावर चाकूने वार करून तो पसार झाला. या प्रकरणी हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी पसार झालेल्या आरोपीचा शोध सुरू केला. काळे यांच्यावर निखळने हल्ला केल्याची माहिती मिळाली. निखळला हांडेवाडी परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने मित्र कांबळे याचा खून केल्याची कबुली दिली.
पोलिस उपायुक्त आर. राजा, सहाय्यक आयुक्त अश्विनी राख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष पांढरे, गुन्हे शाखेचे निरीक्षक पंडित रेजितवाड, सहाय्यक निरीक्षक अर्जुन कुदळे, उपनिरीक्षक महेश कवळे, सुशील लोणकर, अतुल पंधरकर, अमोल दणके यांनी ही कारवाई केली. सहायक निरीक्षक दीपक बर्गे तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.