

पुणे, ता. ३० ः महाराष्ट्रीय कलोपासक आयोजित ५९व्या आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा निकाल शुक्रवारी जाहीर झाला. यंदा स. प. महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय, गरवारे वाणिज्य महाविद्यालय यांसह एकूण नऊ संघांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.
अंतिम फेरीसाठी निवड झालेल्या संघांमध्ये बी. व्ही. जी. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी (बिजागरी), महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे सिनिअर कॉलेज (तेंडुलकर्स), स. प. महाविद्यालय (पार्टनर), आय. एम. सी. सी. (सखा), न्यू आर्ट्स कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालय, अहमदनगर (देखावा), विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, बारामती (पाटी), गरवारे वाणिज्य महाविद्यालय (बस नं. १५३२), डॉ. भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (तृष्णाचक्र) आणि फर्ग्युसन महाविद्यालय (११,१११) या संघांचा समावेश आहे. आता या संघांमध्ये मानाचा पुरुषोत्तम करंडक पटकावण्यासाठी चुरस रंगणार आहे.
स्पर्धेची प्राथमिक फेरी १६ ते ३० ऑगस्ट या कालावधीत भरत नाट्य मंदिर येथे पार पडली. यात एकूण ५१ संघांनी सादरीकरण केले. प्राथमिक फेरीचे परिक्षण मंजूषा जोशी, गोपाळ जोशी आणि अभिजित मकाशीर यांनी केले. स्पर्धेची अंतिम फेरी २१ व २२ सप्टेंबरला भरत नाट्य मंदिर येथे रंगणार आहे.
अन्य निकाल
अभिनय उत्तेजनार्थ पारितोषिके : (नाव, एकांकिका, महाविद्यालय या क्रमाने)
वैभव वासणकर (भ्रीडी, डॉ. डी. वाय. पाटील ज्ञानप्रसाद युनिव्हर्सिटी बी. स्कूल)
मिहीर माईणकर (जीवनसाठे अंडरग्राऊंड, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ)
शर्वायु ढेमसे (निर्वाण, राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय)
वेदिका वाबळे (समुद्र बिलोरी ऐना, प्रतिभा कॉलेज ऑफ कॉमर्स ॲण्ड कॉम्प्युटर स्टडिज)
ऋतिक रास्ते (फिर्याद, टी. जे. कॉलेज कला, वाणिज्य, शास्त्र महाविद्यालय)
रूपाली सोनवले (थँक यू!, अण्णासाहेब मगर महाविद्यालय)
राजसी वळामे (स्कीम, मॉडर्न महाविद्यालय, गणेशखिंड)
केदार लगस (शाळा तपासणी, एन. बी. एम. सिंहगड टेक्निकल इन्स्टिट्यूट)
सोहम देशपांडे (अरे आवाज कोणाचा...?, भिवराबाई सावंत अभियांत्रिकी महाविद्यालय)
अविष्कार ठाकूर (अय, पेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगर)
उत्तेजनार्थ विद्यार्थी दिग्दर्शक
ऋतुराज दंडवते (अय, पेमराज सारडा महाविद्यालय, अहमदनगर)
उत्तेजनार्थ विद्यार्थिनी दिग्दर्शिका
वैष्णवी जमदाडे (निर्वाण, राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.