जातीच्या प्रवर्गाचा उल्लेख अखेर रद्द
पुणे, ता. १८ : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या बारावीच्या परीक्षेसाठी यापूर्वीच प्रवेशपत्र (हॉल तिकीट) उपलब्ध करून देण्यात आली आहेत. परंतु, या प्रवेशपत्रांवर जातीचा प्रवर्ग कॉलमची छपाई करण्यात आली होती. याबाबत लोकभावनेचा आदर करून राज्य मंडळाने दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच, या प्रवेशपत्रांवरील जातीचा प्रवर्ग हा कॉलम रद्द करण्यात येत असून, त्याप्रमाणे नव्याने तयार केलेली प्रवेशपत्रे गुरुवारपासून (ता. २३) राज्य मंडळांच्या ‘एडमिट कार्ड’ या लिंकद्वारे डाऊनलोड करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहेत, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांनी दिली.
तसेच, राज्य मंडळाच्या दहावीच्या परीक्षेसाठी सर्व विभागीय मंडळातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावरील जातीचा प्रवर्ग हा कॉलम रद्द करण्यात येत आहे. ही प्रवेशपत्रे ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या ‘www.mahahsscboard.in’ या संकेतस्थळावर सोमवारी (ता. २०) दुपारी तीन वाजल्यापासून ‘एडमिट कार्ड’ या लिंकद्वारे डाऊनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच, डाऊनलोड संदर्भातील उर्वरित इतर सूचना आणि विद्यार्थ्यांची परीक्षाविषयक माहिती आहे, तशीच कायम राहील. यात कोणताही बदल होणार नाही, याची सर्व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य, माध्यमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी नोंद घ्यावी, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

