

पुणे, ता. ४ : सांगवी येथे राहणाऱ्या ४४ वर्षीय महिलेची ससून रुग्णालयात आतड्याच्या कर्करोगाची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्यात आली. यामध्ये तिच्या मोठ्या आतड्याचा कर्करोगग्रस्त भाग काढून टाकला.
महिलेच्या पोटात दुखत होते. तसेच ओटीपोट दुखणे, बद्धकोष्ठता हा त्रास होत होता. तीन आठवड्यांपूर्वी तिला वेदना होत असताना ससून रुग्णालयात आणले. यावेळी तिची सिटी स्कॅन तपासणी करण्यात आली. यानंतर तिची आतड्याची दुर्बिणीने तपासणी (कोलोनोस्कोपी) केली. त्यामध्ये तिचे मोठे आतडे हे काही प्रमाणात अरुंद झालेले व सुजल्याचे आढळले. यावेळी तेथील आतड्याचा तुकडा कर्करोग आहे का, हे पाहण्यासाठी (बायोप्सी चाचणी) घेतला व तपासणीसाठी पाठवला. दरम्यान, तिचा बद्धकोष्ठतेचा त्रास दूर झाल्याने तिला घरी सोडले होते.
घरी गेल्यावर ८ ते १० दिवसांनंतर तिला पुन्हा त्रास होऊ लागला. तिला पुन्हा ससूनमध्ये भरती केले. ‘पेट स्कॅन’ तपासणी केली असता त्यामध्ये कर्करोगाची शक्यता सांगितली होती. इतर तपासण्या केल्या असता तिच्या उजव्या बाजूच्या मोठ्या आतड्याला आतील बाजूस गाठी असल्याचे व ‘म्युसिनस एडेनोकार्सिनोमा’ या प्रकारच्या कर्करोगाचे निदान झाले. यावेळी तिची शस्त्रक्रिया करून कर्करोगाची शक्यता असलेली आतडी काढून टाकली व शस्त्रक्रिया केलेले आतडे पुन्हा इतर आतड्यांना जोडले. ही शस्त्रक्रिया ससून रुग्णालयाचे शल्यविशारद डॉ. किरणकुमार जाधव व त्यांच्या पथकाने केली. आता तिच्या पोटाच्या सर्व समस्या दूर झाल्या असून, तिला लवकरच घरी सोडण्यात येणार आहे. तसेच टप्प्याटप्प्याने केमोथेरपीही देण्यात येणार आहे, अशी माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ पवार यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.