अडीचशे सीसीटीव्ही तपासून अल्पवयीन मुलींचा लावला छडा
पुणे, ता. १२ : शहराच्या मध्य भागातील बुधवार पेठेतील एका सामाजिक फाउंडेशनमधून निघून गेलेल्या दोन अल्पवयीन मुलींना शोधण्यात फरासखाना पोलिसांना यश आले. त्यासाठी पोलिसांनी तब्बल अडीचशेहून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील चित्रीकरण तपासून सहकारनगर परिसरातून मुलींचा शोध घेतला.
बुधवार पेठेतील तितली फाउंडेशन येथून १४ आणि आठ वर्षे या वयोगटातील दोन अल्पवयीन मुली अचानक निघून गेल्या. मुलींचे अपहरण झाल्याची तक्रार प्राप्त झाली. त्यावरून फरासखाना पोलिस ठाण्यात सात मार्चला गुन्हा दाखल करण्यात आला. फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रशांत भस्मे यांनी सहाय्यक निरीक्षक वैभव गायकवाड, पोलिस उपनिरीक्षक अरविंद शिंदे यांना तपासाबाबत सूचना दिल्या. त्यांच्यासह खडक, समर्थ, विश्रामबाग पोलिस ठाण्यांच्या तपास पथकातील कर्मचाऱ्यांची सात पथके तयार केली. या पथकातील पोलिस अधिकारी आणि अंमलदारांनी पासोड्या विठोबा मंदिर, बुधवार चौक, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, स्वारगेट बस स्थानक, ससून रुग्णालय, पुणे रेल्वेस्थानक, केशवनगर, पद्मावती, सहकारनगर भागात जवळपास २५२ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांतील चित्रीकरण तपासले. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील या चित्रीकरणाच्या मदतीने दोन अल्पवयीन मुलींचा शोध घेत गुन्हा उघडकीस आणला.
अतिरिक्त पोलिस आयुक्त प्रवीणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त संदीपसिंग गिल, सहाय्यक आयुक्त अनुजा देशमाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कारवाई केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

