

पुणे, ता. ३१ : नीलेश चव्हाण याचा शशांक हगवणे आणि वैष्णवी यांच्या लग्नाच्या बैठकांत आणि हगवणे दांपत्याच्या वादविवादामध्ये सक्रिय सहभाग होता. वैष्णवीचे सासरे राजेंद्र आणि दिर सुशिल यांच्या मदतीने सासू लता, नणंद करिष्मा यांचे मोबाईल त्याने पळविले आहेत. गुन्ह्याच्या अनुषंगाने विविध मुद्द्यांवर तपास करण्यासाठी नीलेश चव्हाण, राजेंद्र आणि सुशिल हगवणे यांची एकत्रितपणे चौकशी करायची असल्याचे बावधन पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात फरार असलेल्या नीलेश चव्हाण (वय ३५, रा. औदुंबर सोसायटी, कर्वेनगर) याला शुक्रवारी नेपाळ सीमेवरून अटक केली आहे. त्याला शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला तीन जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली तर वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे (वय ५४) आणि दिर सुशिल राजेंद्र हगवणे (वय २७, रा. दोघेही रा. मुक्ताई गार्डनजवळ, भुकूम, मुळशी) यांच्या पोलिस कोठडीत तीन जूनपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी व्ही. पी. खंदारे यांनी दिले.
इतर आरोपींच्या मदतीने वैष्णवीचा छळ
नीलेश चव्हाणकडे परवानाधारक शस्त्र आहे. त्याचा वापर करून त्याने वैष्णवीला छळ करण्यासाठी धमकावल्याची शक्यता आहे. चव्हाण हा वैष्णवीची नणंद करिष्माचा जवळचा मित्र आहे. त्याने इतर आरोपींच्या मदतीने कट रचून चिथावणी दिली आहे. शशांक, सुशील आणि राजेंद्र हगवणे यांच्यासोबत नीलेश चव्हाणचे आर्थिक संबंध आहेत का? याचा तपास करायचा आहे.
वैष्णवीची सासू लता आणि नणंद करिष्मा हगवणेचा मोबाईल नीलेश चव्हाणकडे देण्यात आले होते. गुन्हा घडल्यानंतर तो नेपाळ येथे पळून जाण्याच्या तयारीत होता. त्याला पळून जाण्यासाठी मदत कोणी केली? कुठल्या मार्गाने तो तिथपर्यंत पोहोचला? वैष्णवीच्या मुलाचे पालकत्व नसताना कोणत्या कारणासाठी बाळाला ताब्यात ठेवले होते. या गुन्ह्यातील पूर्वीचे आरोपी आणि चव्हाणमध्ये झालेले संभाषणाच्या चॅटिंगचा तपास करायचा आहे. राजेंद्र आणि सुशील हगवणे यांच्याकडून जप्त केलेल्या वस्तूंबरोबर हुंडा म्हणून रोख रकमेसह इतर वस्तू घेण्यात आल्या आहेत. त्या जप्त करायच्या असल्याने पोलिस कोठडी देण्याची मागणी तपास अधिकारी अनिल विभूते आणि सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली.
चव्हाणला अटक करणे बेकायदा
बचाव पक्षाच्या वतीने बाजू मांडताना स्वानंद गोविंदवार यांनी युक्तिवाद केला की, नीलेश हा हगवणे कुटुंबीयांचा नातेवाईक नसल्याने त्याला या गुन्ह्यात अटक करणे बेकायदेशीर आहे. निलेशकडे सह आरोपीचे मोबाईल असू शकतात, ही तपास यंत्रणांची बिनबुडाची भूमिका आहे. नीलेश हा हगवणे कुटुंबाला मदत करत होता. म्हणून त्याला आरोपी केले आहे. नीलेश चव्हाणने त्याच्यावर दाखल गुन्ह्यात नेहमीच पोलिसांना सहकार्य करत असल्याचे सांगितले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.