शरद पवार - अजित पवार बैठकीच्या निमित्ताने एकत्र

शरद पवार - अजित पवार बैठकीच्या निमित्ताने एकत्र
Published on

पुणे, ता. १ : ऊस लागवडीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापराबाबत साखर संकुलामध्ये रविवारी बैठक झाली. या बैठकीत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) आणि बारामती अॅग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट या संस्थांमध्ये ऊस पिकासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाचा करार करण्यात आला. यानिमित्ताने पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र आले होते.

या बैठकीला ‘व्हीएसआय’चे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह माजी मंत्री दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील, राजेश टोपे, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, ‘व्हीएसआय’चे महासंचालक संभाजी कडू-पाटील उपस्थित होते.

ऊस पिकासाठी ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर वाढविण्याच्या दृष्टीने यावेळी सादरीकरण करण्यात आले. दोन्ही संस्थांच्या सहकार्याने ऊस शेतीमध्ये ‘एआय’द्वारे प्रयोग करण्यासंबंधी चर्चा झाली. दरम्यान, ऊसशेतीमधील ‘एआय’ प्रयोगाच्या चर्चेच्या निमित्ताने शरद पवार आणि अजित पवार मागील महिन्यात बैठकीत एकत्र आले होते. त्यानंतर रविवारी पुन्हा एकत्र आले. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, याबाबत नेहमी चर्चा रंगत आहेत. तत्पूर्वी कृषी हॅकेथॉन कार्यक्रमानंतर अजित पवार यांना रविवारी पत्रकारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का, असे विचारले असता त्यांनी भाष्य करणे टाळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com