जिल्ह्यात ६८ टक्के मतदान इंदापूर नगरपरिषदेसाठी सर्वाधिक ७८. ८९ टक्के
पुणे, ता. २ ः जिल्ह्यातील बारा नगरपरिषद आणि तीन नगरपंचायतींसाठी मंगळवारी सकाळपासून मतदानासाठी उत्साहाचे वातावरण होते. काही ठिकाणी किरकोळ वादाचे प्रसंग घडले असून, इतर ठिकाणी शांततेमध्ये मतदान झाल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात प्रशासनाच्या अंदाजानुसार ६८.०१ टक्के मतदान झाले. सर्वाधिक ७९.८९ टक्के मतदान इंदापूर नगरपरिषदेसाठी झाले. रविवारी (ता. २१) मतमोजणी होणार आहे.
निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील बारामती, फुरसुंगी उरुळी देवाची या नगरपरिषदा वगळता आणि तळेगाव दाभाडे, दौंड, लोणावळा आणि सासवड नगरपरिषदांमधील दहा प्रभाग वगळता १२ नगरपरिषदा आणि तीन नगरपंचायतींसाठी मंगळवारी जिल्ह्यातील ५२४ केंद्रांवर मतदान झाले. सकाळी साडेसातला मतदानास सुरवात झाल्यानंतर टप्प्याटप्याने वाढलेल्या उपस्थितीमुळे दुपारी साडेतीनपर्यंत जिल्ह्यात ५१.०६ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर सायंकाळी मतदानाचा वेग वाढला होता. अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान, मतदान सुरू होण्यापूर्वी ‘मॉक पोल’ घेतल्यानंतर प्रत्यक्ष मतदानाला सुरवात झाली.
मतदानासाठी एकूण ५२४ मतदान केंद्रांवर चार लाख ५१ हजार २५ मतदारांना शांततेत मतदान करता यावे, सुरळीत प्रक्रिया होण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी करण्यात आली होती. सुमारे नऊ वर्षाहून अधिक कालावधीनंतर झालेली ही निवडणूक सर्वच पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती.
नगरपरिषद, नगरपंचायत -- टक्केवारी
लोणावळा -- ७१.३४
दौंड -- ५९.३२
तळेगाव दाभाडे -- ४९.२४
चाकण -- ७४.२८
सासवड -- ६७.०२
जेजुरी -- ७८.०६
इंदापूर --७९.८९
शिरूर -- ७१.१४
जुन्नर -- ६८.३९
आळंदी -- ७५.६६
भोर -- ७६.९६
राजगुरुनगर -- ६८.८७
वडगाव -- ७३.३३
माळेगाव -- ७७.१९
मंचर -- ७४.१९
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

