व्यावसायिक वादातून चिखलीत गोळीबार; दोघे जखमी

व्यावसायिक वादातून 
चिखलीत गोळीबार; दोघे जखमी

पिंपरी, ता. १२ : व्यावसायिक वादातून एकावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. १२) सायंकाळी चिखलीतील जाधववाडी परिसरात घडली. यात दोघे जमखी झाले असून, एकाची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
व्यावसायिक अजय फुले (वय १९, रा. मोहननगर) व सहआरोपी कीर्ती भिऊलाल लिलारे अशी जखमींची नावे आहेत. हर्षल सोनावणे, श्याम चौधरी (रा. जाधववाडी, चिखली) अशी आरोपींची नावे आहेत. जखमी कीर्ती लिलारे हा आरोपींचा साथीदार आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय फुले व हर्षल सोनावणे या दोघांचा जाधववाडी येथे गॅस दुरुस्तीचा व्यवसाय असून, शेजारी दुकाने आहेत. त्यांच्यामध्ये व्यावसायिक स्पर्धेतून वाद होते. या वादातून रविवारी सायंकाळी सोनवणे याने फुले याच्यावर गोळीबार केला. यात एक गोळी फुले याच्या दंडाला लागल्याने तो जखमी झाला. दरम्यान, साथीदार कीर्ती लिलारे याच्याही मानेला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. गोळीबार केल्यानंतर आरोपी पसार झाले. दरम्यान, पोलिसांचे गुन्हे शाखा युनिट एकचे पथक तसेच चिखली पोलिसांनी चौधरी व सोनावणे यांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com