आयटी कर्मचारी तक्रार : अपडेटेड
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही आयटी कंपन्यांना मतदानाची सुट्टी नाही
फोरम फॉर आयटी एम्पॉईज संघटनेची तक्रार
पिंपरी, ता. १९ : मतदानाच्या दिवशी खासगी कंपन्या व आस्थापनांना सुटी देण्याचे आदेश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिलेले असतानाही पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील बहुतांश आयटी कंपन्यांना सुटी दिली नसल्याची तक्रार आयटी कर्मचाऱ्यांनी केली आहे.
फोरम फॉर आयटी एम्पॉईज या संघटनेकडे अशा अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून कंपन्यांना सुटी देण्याबाबतच्या सूचना देण्याची करण्याची मागणी फोरम फॉर आयटी एम्पॉईज या संघटनेने ''एक्स''च्या माध्यमातून मंगळवारी(ता. १९) केली.
पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी, तळवडे, बाणेर, खराडी, विश्रांतवाडी या भागातील आयटी पार्कमधील कंपन्यांमध्ये लाखो आयटी कर्मचारी काम करतात. यातले बहुतांश कर्मचारी हे पुण्याबाहेरून येथे आलेले झाले आहेत त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे मतदान आपल्या मूळ गावी आहे. मतदानाच्या दिवशी बहुतांश कंपन्यांनी सुटी जाहीर केलेली नाही तर काही कंपन्यांनी मतदान करण्यासाठी दोन तासांची मुभा दिली आहे. त्यामुळे बाहेरगावी मतदानासाठी जाणारे आयटीयन्स मतदान करण्यास मुकणार आहेत. एका बाजूला प्रशासन मतदानासाठी प्रोत्साहन देत असताना दुसरीकडे मोठा सुटी नसल्याने मतदानाला मुकणार आहे.
‘पुणे पिंपरी चिंचवडमधल्या आयटी कंपन्यांमध्ये काम करणाराे बहुतांश आयटीयन्स बाहेरून आलेले आहेत त्यामुळे त्यांना जर मतदानाचा हक्क बजावयचा असेल तर सुटी मिळणे आवश्यक आहे. मात्र बहुतांश कंपन्या सुटी देत नाहीत किंवा वर्क फ्रॉम होम देतात अशा वेळी प्रवास करुन मतदान करणे शक्य होत नाही. त्यामुळे मतदानाच्या दिवशी सुटी असणे आवश्यक आहे.
- पवनजीत माने, अध्यक्ष, फोरम फॉर आयटी एम्पॉईज संघटना
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

