पिंपोडे बुद्रुक संजीवराजेंच्या हस्ते क्रिकेट स्पर्धा उदघाटन

पिंपोडे बुद्रुक संजीवराजेंच्या हस्ते क्रिकेट स्पर्धा उदघाटन

Published on

तरुणांनी खेळावर लक्ष केंद्रित करावे

संजीवराजे निंबाळकर; पिंपोडे बुद्रुकला सभापती चषक क्रिकेट स्‍पर्धा

पिंपोडे बुद्रुक, ता. ९ : तरुणांनी सोशल मीडियापासून सुरक्षित अंतर ठेवून खेळावर लक्ष केंद्रित केले, तर मानसिक तणाव कमी होऊन शरीर सक्षम होईल, असे मत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.
येथे पंचायत समितीचे माजी उपसभापती संजय साळुंखे व राहुल धुमाळ मित्र समूहातर्फे आयोजित सभापती चषक क्रिकेट स्पर्धेचे उद्‌घाटन संजीवराजेंच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
ते म्हणाले, ‘‘सध्या राजकारणात काय चाललंय ते तुम्ही एबी फॉर्म वाटपातून पाहात आहात. राजकारण वेगळ्या दिशेने नेलं जात आहे. मात्र, हे सगळं बदलायचं असेल तर तरुणांना पुढे यायला लागेल. त्यासाठी मोबाईल दूर ठेवून परिश्रम घ्यावे लागतील. खेळ हा भिन्न विचारसरणी व आर्थिक परिस्थिती असलेल्या तरुणांना एकत्र आणतो. त्या माध्यमातून वैचारिक देवाणघेवाण होते आणि संघटन वाढते. ग्रामीण भागातील युवकांमध्ये जिद्द आणि चिकाटी आहे. त्यामुळे कोणत्याही क्षेत्रात तो यशस्वी होऊ शकतो. त्याकरिता उत्तम आरोग्य असणे आवश्यक असून, मैदानी खेळांच्या स्पर्धांचे गावोगावी आयोजन करायला पाहिजे. त्याला आर्थिक पाठबळ देण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन.’’ यावेळी शिवाजी विद्यापीठ आंतरविभागीय हँडबॉल स्पर्धेत विजेत्या संघातील खेळाडूंचा त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संजय साळुंखे यांनी प्रास्ताविक केले. वैभव साळुंखे यांनी आभार मानले. यावेळी सुरेशराव साळुंखे, अशोकराव लेंभे, विकास साळुंखे, जनार्दन निकम, निकम, अजित भोईटे, ॲड. मेघराज भोईटे, जितेंद्र जगताप, अजित भोईटे, पिलाजी धुमाळ, संदीप धुमाळ, दयाराम सोळसकर, संग्राम सोळसकर, जीवन फडतरे, दिलीप अहिरेकर, भूषण पवार, अमोल भोईटे, संदीप कदम, संभाजी धुमाळ, छप्पन साळुंखे, बशीरखान पठाण, मितीन भोईटे, रतन साळुंखे, खेळाडू व ग्रामस्थ उपस्थित होते.

फोटो :...........PIP26B01578
पिंपोडे बुद्रुक : हँडबॉल स्पर्धेतील विजेत्या संघातील खेळाडूंचा सत्कार करताना संजीवराजे नाईक-निंबाळकर, समवेत ग्रामस्थ व कार्यकर्ते. (राहुल लेंभे : सकाळ छायाचित्रसेवा)
.............................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com