मेट्रो घटना क्रम

मेट्रो घटना क्रम

वाटचाल मेट्रोची
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी (ता. १) वनाज ते गरवारे महाविद्यालय आणि पिंपरी ते फुगेवाडी दरम्यानच्या विस्तारित मेट्रो मार्गाचे उद्घाटन होत आहे. हा टप्पा गाठण्यासाठी सुमारे १७ वर्ष लागली. मेट्रोच्या आगमनाने पुण्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने एक पाऊल पुढे पडत आहे. वनाज - रामवाडी आणि पिंपरी चिंचवड - स्वारगेट हा संपूर्ण मेट्रोमार्ग या वर्षाच्या अखेरीस कार्यान्वित होणार आहे.
-२१ नोव्हेंबर २००६ : मेट्रो प्रकल्पासाठी स्थायी समितीकडून ‘दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन’ची (डीएमआरसी) नियुक्ती
-२८ जून २००६ : वनाज-रामवाडी मार्ग महापालिकेने मंजुरीसाठी राज्य सरकारकडे पाठविला
-४ सप्टेंबर २००९ : ‘डीएमआरसी’कडून प्रकल्प अहवालाचे महापालिकेला सादरीकरण
- २७ जानेवारी २०१० : महापालिकेच्या सर्वसाधारण सभेकडून ‘डीएमआरसी’च्या प्रकल्प अहवालाला मंजुरी
- २८ जून २०१२ : वनाज-रामवाडी मार्ग मंजुरीसाठी राज्य सरकारने केंद्र सरकारकडे पाठविला
- २४ सप्टेंबर २०१२ : पिंपरी-चिंचवड-स्वारगेट मार्गाला पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सर्वसाधारण सभेची मंजुरी
- १४ जानेवारी २०१३ : वाढलेली किंमत लक्षात घेऊन सुधारित मेट्रो अहवाल पाठविण्याचा राज्य सरकारचा पुणे आणि पिंपरी महापालिकेला आदेश
- २४ जानेवारी २०१३ : दोन्ही महापालिकांकडून सुधारित अहवाल सादर
- ११ फेब्रुवारी २०१४ : केंद्र सरकारकडून मेट्रो प्रकल्पाला तत्त्वतः मंजुरी
- २६ जून २०१४ : प्री- पीआयबीसाठी (सार्वजनिक गुंतवणूक मंडळ) मेट्रो प्रस्ताव दाखल
- ७ मार्च २०१५ : मार्गावरील आक्षेपाबाबत गिरीश बापट समिती नियुक्ती
- २० एप्रिल २०१५ : बापट समितीचा अहवाल राज्य सरकारला सादर
- १ डिसेंबर २०१५ : बापट समितीच्या शिफारशींनुसार बदल करून राज्य सरकारने केंद्राला मेट्रो प्रस्ताव पाठविला
- १४ नोव्हेंबर २०१६ : ‘पीआयबी’ची दिल्लीत बैठक, मेट्रो प्रकल्पाला मंजुरी, अंतिम मान्यतेसाठी प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयाकडे सादर
- २४ डिसेंबर २०१६ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवडमधील ३१ किलोमीटरच्या मेट्रो मार्गाचे ऑनलाइन भूमिपूजन
- १ जानेवारी २०१७ : मेट्रोच्या मुख्य कार्यालयाचे काम सुरु
-११ जुलै २०१७ : नाशिक फाटा येथे पुणे मेट्रोच्या पहिले पिलरचा पाया घेण्याचे काम पूर्ण
-२५ ऑक्टोबर २०१७ : वल्लभनगर
जवळील पुणे मेट्रोच्या पहिले पिलरचे काम पूर्ण
-११ मार्च २०१८ : पौड रस्त्यावर पहिले पिलरचे काम पूर्ण
- २० मार्च २०१८ : वनाज-रामवाडी मार्गावर पहिल्या सेंगमेंटची उभारणी
- १७ नोव्हेंबर २०१९ : भुयारी मेट्रोसाठी टनेल बोअरिंग मशिन पुण्यात दाखल
- २५ डिसेंबर २०१९ : भुयारी मेट्रोचे काम सुरू
-ऑगस्ट २०२० : वनाज ते रामवाडी दरम्यान एलिव्हेटेड मेट्रोच्या खांबांची उभारणी पूर्ण
- नोव्हेंबर २०२० : वनाज-गरवारे मार्गावर गर्डरचे काम पूर्ण
- मार्च २०२१ : लोहमार्ग टाकण्याचे काम
पूर्ण
-एप्रिल २०२१ : सिग्नलिंग, टेलिकम्युनिकेशन सिस्टीम उभारणीस प्रारंभ
- जून २०२१ : मेट्रोच्या ११ स्थानकांची उभारणी पूर्ण
- ३० जुलै २०२१ : मेट्रोची पाच किलोमीटरची ट्रायल रन पूर्ण
- नोव्हेंबर २०२१ : वनाज-गरवारे दरम्यानची बहुतांश काम पूर्ण
- ६ जानेवारी २०२२ : उद्घाटनासाठी ११ मेट्रो स्थानके तयार
- ६ मार्च २०२२ - वनाज- गरवारे महाविद्याल आणि पिंपरी चिंचवड- फुगेवाडी मेट्रो मार्गांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

‘सकाळ’ची आग्रही भूमिका
मेट्रोतून प्रवास करण्याच्या स्वप्नपूर्तीसाठी पुणेकरांना एका दशकापेक्षा जास्त कालावधीची वाट पहावी लागली. या प्रकल्पात अनेक अडचणीही आल्या. मात्र, पुणेकरांची भावना लक्षात घेऊन ‘सकाळ’ने मेट्रो लवकर धावली पाहिजे, यासाठी आग्रही भूमिका घेत पाठपुरावा केला. या प्रकल्पाचा आढावा घेणारी विशेष पुरवणी ‘सकाळ’ने १८ जून २०१० रोजी प्रसिद्ध केली होती. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी मेट्रोची आवश्‍यकता का आहे, मेट्रोचा मार्ग कसा असेल आणि या प्रकल्पाचे नेमके नियोजन कसे असेल, आदींबाबतचा आढावा या पुरवणीत घेण्यात आला होता.
-----

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com