Mon, Jan 30, 2023

गरवारे महाविद्यालयाचे छात्र ११ व्या वर्षी कर्तव्यपथावर
गरवारे महाविद्यालयाचे छात्र ११ व्या वर्षी कर्तव्यपथावर
Published on : 24 January 2023, 1:29 am
पुणे, ता. २४ : प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीत होणाऱ्या संचलनासाठी आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या आर्मी विंगच्या तीन छात्रांची निवड झाली आहे. कर्तव्यपथावर संचलनाचे महाविद्यालयाचे हे सलग ११ वे वर्ष आहे. सीनियर अंडर ऑफिसर सायली कुलकर्णी, ज्युनिअर अंडर ऑफिसर निष्णा भोराडे आणि सर्वेश मोरे यांची निवड झाली. छात्रांची निवड प्रक्रिया ऑक्टोबरपासून सुरू होते. या छात्रांना महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या डॉ. गौतमी पवार, दोन महाराष्ट्र बटालियन ‘एनसीसी’चे कमान अधिकारी कर्नल फरहाद अहमद, महाविद्यालयाचे एनसीसी अधिकारी कॅप्टन संदीप नवले, लेफ्टनंट जोगिंदर सिंग, सीनियर जीसीआई रूपा मोरे आणि हवलदार विजय कुमार यांनी मार्गदर्शन केले.