Thur, Feb 2, 2023

भागवत कथेद्वारे सप्ताहाची सुरवात
भागवत कथेद्वारे सप्ताहाची सुरवात
Published on : 24 January 2023, 5:46 am
भागवत कथेद्वारे सप्ताहाची सुरवात
पुणे, ता. २४ ः ‘सध्याच्या ताणतणावाच्या युगात भागवत कथा ऐकणे महत्त्वाचे ठरते. भक्तिमार्ग हा सहज आणि सोपा असून, यामुळे एक सकारात्मक भाव निर्माण होतो,’ असे प्रतिपादन कृष्णनामदास महाराज यांनी केले. श्री कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे, तर भागवत कथेद्वारे या सप्ताहाची सुरवात करण्यात आली.
यावेळी कृष्णनामदास महाराज यांनी भागवत कथेचे माहात्म्य सांगितले. गणेश कलाक्रीडा रंगमंच येथे झालेल्या या कार्यक्रमप्रसंगी हितेंद्र सोमाणी, श्रीकांत मुछाल, राज मुछाल, राजेश मित्तल, राजेश मेहता, हंसराज किराड आदी उपस्थित होते.
-