दोन वरिष्ठ पोलिस निरीक्षक नियंत्रण कक्षाशी संलग्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दोन वरिष्ठ पोलिस निरीक्षक नियंत्रण कक्षाशी संलग्न
दोन वरिष्ठ पोलिस निरीक्षक नियंत्रण कक्षाशी संलग्न

दोन वरिष्ठ पोलिस निरीक्षक नियंत्रण कक्षाशी संलग्न

sakal_logo
By

पुणे, ता. २५ : पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी शहरातील दोन पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना नियंत्रण कक्षाशी संलग्न केले आहे. आगामी दहा दिवसांसाठी हा आदेश काढण्यात आला आहे. येरवडा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळकृष्ण कदम आणि सिंहगड रोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश संखे यांना नियंत्रण कक्षाशी संलग्न केले आहे. येरवडा आणि सिंहगड रोड या पोलिस ठाण्यांच्या हद्दीत गोळीबाराच्या घटना घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलिस आयुक्त रितेशकुमार यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांमध्ये खळबळ उडाली आहे.