एचआयव्हीबाधित पतीकडून पत्नीवर चाकूहल्ला
पुणे, ता. २५ : पत्नी सासरी नांदण्यास येत नसल्याच्या कारणावरून एका एचआयव्हीबाधित पतीने त्याच्या पत्नीवर चाकूने वार केल्याची घटना बिबवेवाडी परिसरात घडली. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली आहे.
हा प्रकार सोमवारी (ता. २३) सायंकाळी सहाच्या सुमारास घडला. पत्नीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पत्नीने जबाब दिल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पती (वय ३७) हा सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील म्हैसगाव येथील रहिवासी आहे. त्याची २७ वर्षीय पत्नी बिबवेवाडी येथील सुखसागरनगर राहते. पती एचआयव्ही बाधित असल्यामुळे ती त्याच्याकडे नांदण्यास जात नव्हती. त्यामुळे पतीने पत्नीच्या छाती, दंड आणि गुप्तांगावर चाकूने वार करून जखमी केले. तिच्यावर रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
------
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.