माया तळेकर यांना ‘गुणवंत शिक्षिका’ पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माया तळेकर यांना ‘गुणवंत शिक्षिका’ पुरस्कार
माया तळेकर यांना ‘गुणवंत शिक्षिका’ पुरस्कार

माया तळेकर यांना ‘गुणवंत शिक्षिका’ पुरस्कार

sakal_logo
By

पुणे, ता. ३० ः महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी प्रणीत पुणे शहर शिक्षक लोकशाही आघाडी (टी.डी.एफ ) व पुणे शहर माध्यमिक शिक्षक संघ यांच्यातर्फे खराडीतील सुंदरबाई मराठे विद्यालयातील शिक्षिका माया तळेकर यांना यंदाचा क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला आहे. तळेकर या विद्यार्थ्यांसाठी राबवीत असलेले उपक्रम व त्यांची कृतिशीलता लक्षात घेऊन त्यांच्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना गुणवंत पुरस्कार प्रदान करण्यात आला. तळेकर या एक गीतकारही आहेत.