सराईत गुन्हेगारावर ‘एमपीडीए’ कारवाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सराईत गुन्हेगारावर ‘एमपीडीए’ कारवाई
सराईत गुन्हेगारावर ‘एमपीडीए’ कारवाई

सराईत गुन्हेगारावर ‘एमपीडीए’ कारवाई

sakal_logo
By

पुणे, ता. ३१ : शहरात दहशत माजविणाऱ्या एका सराईत गुन्हेगारावर पोलिसांनी एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. उमेश वसंत जंगम (वय २५ रा. नारायण पेठ) असे त्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
उमेश जंगम आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध विश्रामबाग, दत्तवाडी आणि फरासखाना पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, सदोष मनुष्यवध, घरफोडी, दुखापत करणे असे गंभीर स्वरूपाचे सहा गुन्हे दाखल आहेत. नागरिकांच्या जीविताचे आणि मालमत्तेचे नुकसान होईल, या भीतीमुळे नागरिक उघडपणे तक्रार करण्यास धजावत नव्हते. या संदर्भात पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आरोपी उमेश जंगम याची एमपीडीए कायद्यांतर्गत कोल्हापूर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी रवानगी केली आहे.
फरासखाना पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शब्बीर सय्यद, पीसीबी विभागाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेखा वाघमारे यांनी ही कारवाई केली. पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर एमपीडीए कायद्यांतर्गत केलेली ही पहिलीच कारवाई आहे. यापुढेही सराईत गुन्हेगारांविरुद्ध प्रतिबंधक कारवाई करण्यात येणार आहे.