चोरडियांचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी : मणियार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चोरडियांचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी : मणियार
चोरडियांचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी : मणियार

चोरडियांचे शैक्षणिक कार्य प्रेरणादायी : मणियार

sakal_logo
By

पुणे, ता. ६ : ‘‘आपल्या मातापित्याचे संस्कार, शिकवण यातून आपली जडणघडण होते. समाजाचाही त्यात वाटा असतो. सुषमा व संजय चोरडिया यांनी समाजाचा विसर पडू न देता चांगले कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा उपक्रम राबविला आहे. सामाजिक जाणिवेतून त्यांनी उभारलेले शैक्षणिक कार्य प्रेरणादायी, दिशादर्शक व कौतुकास्पद आहे,’’ असे मत उद्योजक विठ्ठल मणियार यांनी येथे व्यक्त केले.

सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित बन्सी-रत्न चॅरिटेबल ट्रस्टतर्फे शकुंतला व शांतिलाल कोठारी या दांपत्यास ‘बन्सी-रत्न आदर्श माता-पिता राष्ट्रीय पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या वेळी जैन समाजातील दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचेही कौतुक करण्यात आले.

कांतिलाल मुनोत यांना ‘समाज शिरोमणी,’ सुरेखा कटारिया यांना ‘समाजरत्न,’ प्रफुल्ल कोठारी यांना ‘समाजभूषण व मानवसेवा,’ साधना ललवाणी यांना ‘मानवसेवा,’ संतोष चोरडिया यांना ‘मानवसेवा व आयकॉन ऑफ राजस्थान,’ तर अक्षय जैन आणि रुचिरा मणियार यांना ‘आयकॉन ऑफ राजस्थान’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि उपरणे असे या पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आचार्य डॉ. लोकेश मुनीजी, सामाजिक कार्यकर्ते पृथ्वीराज धोका, माईंड ट्रेनर डॉ. दत्ता कोहिनकर, बन्सी-रत्न चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक प्रा. डॉ. संजय चोरडिया व उपाध्यक्ष सुषमा चोरडिया, स्नेहल चोरडिया आदी उपस्थित होते. प्रशांत पितालिया यांनी सूत्रसंचालन केले.