Sat, April 1, 2023

यमन रागावर चित्रपट गीते
यमन रागावर चित्रपट गीते
Published on : 7 February 2023, 8:43 am
पुणे, ता. ७ ः निवेदिता प्रतिष्ठानतर्फे ‘अनामप्रेम’ या संस्थेच्या मदतीसाठी ‘यमनरंग’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. व्हाइस आॅफ पुणे या पुण्यातील ग्रुपच्या कलाकारांनी यमन रागावर आधारित गायलेल्या चित्रपट गीतांचा आस्वाद पुणेकरांनी घेतला.
संस्थेच्या अध्यक्षा ॲड. अनुराधा भारती यांनी संगीतकारांनी ‘यमन राग’ चित्रपटासाठी कसा वापरला, याची माहिती दिली. चैतन्य सिंदाळकर या अनामप्रेम संस्थेच्या दृष्टिहीन मुलाने यमन रागातील आरोह, अवरोह, पकड व चलन सादर केली. प्रमुख पाहुणे म्हणून महापालिकेच्या शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष रवी चौधरी, माजी सभासद काका धर्मावत, अनाम प्रेमच्या डॉ. सायली सोमण व सतीश सोमण, सीमा येवलेकर आदी उपस्थित होते.