फेब्रुवारीअखेरपर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीकरण

फेब्रुवारीअखेरपर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीकरण

पुणे, ता. ८ : महापालिकेच्या २१ रुग्णालयांमधून फेब्रुवारीअखेरपर्यंत कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील लसीकरण केंद्राने लस पुरवठा केल्यानंतर होईल. त्यामुळे अद्यापही लस न घेतलेल्या किंवा बूस्टर घेतला नसलेल्या नागरिकांनी प्राधान्याने लस घ्यावी, असे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. त्याचा थेट परिणाम लसीकरण केंद्रांवर येणाऱ्या नागरिकांचे प्रमाणही कमी झाल्याचे निरीक्षण आरोग्य विभागातर्फे नोंदविण्यात आले. कोरोनाचा ओमिक्रॉन हा नवीन व्हेरियंट आल्यानंतर पुणेकरांनी लसीकरण केंद्रांवर गेल्या वर्षी रांगा लावल्या होत्या. त्यानंतर बूस्टर घेण्यासाठी जुलैमध्ये पुणेकरांची मागणी वाढली होती. आता लसीच्या मागणीत वेगाने कमी होत आहे. त्यामुळे उपलब्ध लस संपेपर्यंत लसीकरण केंद्र सुरू ठेवण्यात येणार आहे.

आतापर्यंत झालेले लसीकरण
पहिला डोस ...... ३८,८६,४८१
दुसरा डोस .... ३२,६९,४२०
बूस्टर डोस ... ५,४७,७६६

१२ ते १४ वर्षे वयोगट
पहिला डोस ...... ४४,१०२
दुसरा डोस ..... २९,२१०

१५ ते १८ वयोगट
पहिला डोस .... १,२०,२३९
दुसरा डोस ..... ८१,४५१

१९ ते ४५ वयोगट
पहिला डोस .... २४,०५,२५६
दुसरा डोस ..... १९,५६,३०७

४५ ते ६० वर्षे वयोगट
पहिला डोस .... ६,५४,१८२
दुसरा डोस ..... ५,९०,५५८

६० वर्षेपेक्षा जास्त वयोगट
पहिला डोस .... ४,९३,७२२
दुसरा डोस ..... ४,५१,६१५

पुणे महापालिकेची २१ रुग्णालयांमध्ये कोरोना प्रतिबंधक कोव्हॅक्सिन आणि कोव्हिशिल्ड हे दोन्ही लशींचे डोस उपलब्ध करण्यात आले आहेत. कोव्हिशिल्डच्या सात हजार डोसचा साठा शिल्लक असून, कोव्हॅक्सिन अडीच हजार डोस उपलब्ध आहेत. त्यामुळे नागरिकांनी वाट न बघता नागरिकांनी लसीकरण तातडीने करू घ्यावे. कोव्हिशिल्डचा डोस येत्या शुक्रवारपर्यंत (ता. १०) दिला जाणार आहे. तर, कोव्हॅक्सिन लस या महिनाअखेरपर्यंत दिली जाईल.
- डॉ. सूर्यकांत देवकर, लसीकरण प्रमुख, पुणे महापालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com