‘संवेदना’तर्फे येत्या रविवारी
एपिलेप्सी वधू-वर मेळावा

‘संवेदना’तर्फे येत्या रविवारी एपिलेप्सी वधू-वर मेळावा

Published on

पुणे, ता. ८ ः संवेदना फाउंडेशनतर्फे येत्या रविवारी (ता. १२) एपिलेप्सी वधू-वर मेळावा आयोजित करण्यात आला आहे. नवी पेठे येथील निवारा सभागृहात सकाळी १० वाजता हा मेळावा होणार असून मेळाव्यापूर्वी सकाळी ९ ते १० या वेळेत नावनोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे.
या मेळाव्यात प्रसिद्ध मेंदूतज्ज्ञ डॉ. प्रदीप दिवटे हे विशेष मार्गदर्शन करणार आहेत. तसेच, विवाह समुपदेशक वंदना कुलकर्णी यांचे मार्गदर्शन सत्र होणार आहे. त्यानंतर वधू-वर ओळख होणार असून भोजन सत्रात व सत्रानंतर सर्व कुटुंबांना, मुलामुलींना अनौपचारिक गप्पा मारता येतील.
एपिलेप्सी ही एक मेंदूची व्याधी असून औषधोपचारांनी ती बरी होऊ शकते. ज्यांना औषधांचाही उपयोग होत नाही, त्यांच्यासाठी मेंदूची सर्जरी हा सुद्धा पर्याय आहे. मात्र, एपिलेप्सीबद्दल आपल्या समाजात खूप सारे गैरसमज आणि न्यूनगंड आहेत. ते दूर करण्यासाठी संवेदना फाउंडेशन ही संस्था गेली १९ वर्ष काम करत आहे. हा मेळावा त्याचाच एक भाग असून लग्न करू इच्छिणाऱ्या व एपिलेप्सीचा इतिहास असलेल्या व्यक्तींनी जरूर मेळाव्याला यावे, असे आवाहन संस्थेच्या यशोदा वाकणकर यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.