गर्भवती महिलांसाठी 
तनुश्री संस्कारतर्फे कार्यशाळा

गर्भवती महिलांसाठी तनुश्री संस्कारतर्फे कार्यशाळा

Published on

पुणे, ता. ८ ः तनुश्री संस्कारच्या वतीने मागील अठरा वर्षांपासून गर्भवती महिलासाठी विविध संकल्पनांच्या आधारावर कार्यशाळा आयोजित केली जाते. यंदाच्या वर्षी ‘मोगरा फुलला’ या संकल्पनेवर आधारित मोफत कार्यशाळा पार पडणार आहे. रविवार १२ फेब्रुवारी रोजी सकाळी साडे आठ ते दुपारी १२ या वेळेत नवी सांगवी, साई चौक येथील ‘संस्कृती लाउन्स’ येथे ही कार्यशाळा आयोजित केल्याची माहिती डॉ. सुप्रिया गुगले यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.

‘तनुश्री संस्कार’च्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमात आतापर्यंत सुमारे ९ कुटुंबाने सहभाग नोंदविला आहे. यंदाच्या वर्षी आयोजित केलेल्या स्नेहमेळाव्याचे हे १० वे वर्ष आहे. कार्यशाळेच्या सुरुवातीला ‘मोगरा फुलला’ या विषयांवर रेणू गावसकर हे मार्गदर्शन करतील. या नंतर एक कविता, मन की शक्ती, मन करा रे प्रसन्न अशा एकूण सहा विषयांवर चर्चा व मार्गदर्शन होणार आहे. शिवाय सहभागी महिलांसाठी बासरी वादनाचाही कार्यक्रम होणार आहे. सुमारे १२०० जणांचा या कार्यशाळेत सहभाग राहील असा अंदाज डॉ सुप्रिया गुगले यांनी वर्तविला आहे.यावेळी डॉ अनिल गुगले, कांतिलाल मुनोत आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.