विद्यापीठात केंद्रीय अर्थसंकल्प प्रदर्शन

विद्यापीठात केंद्रीय अर्थसंकल्प प्रदर्शन

Published on

पुणे, ता. ८ : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागात दरवर्षीप्रमाणे केंद्रीय अर्थसंकल्प प्रदर्शन आयोजित केले होते. या प्रदर्शनाचे उद्‌घाटन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनावणे यांच्या हस्ते झाले. लोकांमध्ये अर्थसंकल्पाविषयी जागरूकता निर्माण करणे, अर्थसंकल्पाच्या विविध बाबी समजावून सांगणे व तशी कौशल्ये विकसित करणे अशा दुहेरी हेतूने दरवर्षी हे प्रदर्शन आयोजित केले जाते. पुणे व परिसरातील महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाला भेट दिली आणि त्यांचे अभिप्राय नोंदविले. विभागप्रमुख डॉ. विलास आढाव यांनी या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले. डॉ. मानसी गोरे यांनी या प्रदर्शनासाठी समन्वयक म्हणून काम केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.