फसवणूकप्रकरणी एकास कोठडी

फसवणूकप्रकरणी एकास कोठडी

Published on

पुणे, ता. ८ : खोटे खरेदीखत तयार करून त्याआधारे साताबाराची नोंदणी करून एका महिलेची फसवणूक केल्याप्रकरणात लोणीकंद पोलिसांनी आणखी एकास अटक केली आहे. न्यायालयाने त्याला नऊ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. कल्पेश चंद्रकांत यादव (वय ३६, रा. वडगाव शेरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत नीता उल्हास निगडे (वय ५४, कल्याणीनगर) यांनी फिर्याद दिली आहे. या गुन्ह्यात यापूर्वी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.