चित्रपटसृष्टीत आजही पुरुषांनाच प्राधान्य ः डॉ. लक्ष्मी लिंगम

चित्रपटसृष्टीत आजही पुरुषांनाच प्राधान्य ः डॉ. लक्ष्मी लिंगम

Published on

चित्रपटसृष्टीत आजही पुरुषांनाच प्राधान्य ः डॉ. लक्ष्मी लिंगम

पुणे, ता. ८ ः भारतीय चित्रपटसृष्टीत अजूनही चित्रपटांमध्ये सर्वाधिक भूमिका पुरुष कलाकारांच्या असतात. महिला कलाकार या केवळ नायकाच्या प्रेमिकेच्या भूमिकेत पाहायला मिळतात. अभिनयच नव्हे, तर लेखन, दिग्दर्शन, तांत्रिक अशा सर्वच विभागात महिलांपेक्षा पुरुष कलाकारांना प्राधान्य दिले जाते, असे निरीक्षण टाटा इन्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसच्या स्कूल ऑफ मिडीया अँड कल्चरल स्टडीज विभागाच्या प्रमुख प्रोफेसर डॉ. लक्ष्मी लिंगम यांनी नोंदवले.

पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतर्गत आयोजित ‘जेंडर इन हिंदी सिनेमा’ या विषयावरील सत्रात त्या बोलत होत्या. यावेळी ज्येष्ठ दिग्दर्शिका अरुणा राजे, महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल उपस्थित होते. राजे म्हणाल्या, ‘‘चित्रपटसृष्टीत एक महिला म्हणून काम करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागला. अनेकदा एखादा संवाद, एखादा प्रसंग यासाठी मला भांडावे लागले. महिलांकडे कौशल्य असते, त्या चांगल्या कलाकृती घडवू शकतात यावर अनेकांना विश्वासाच बसत नाही. महिला कलाकारांकडेही उत्तम कौशल्य असते, नावीन्यपूर्ण कल्पना असताता आणि विशेषतः नवा दृष्टिकोन असतात. त्यांच्या कलाकृती प्रत्येक व्यक्तीच्या ज्ञानात भर घालू शकतात. मात्र त्यासाठी त्यांना संधी दिली पाहिजे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.