अमृत महोत्सवी वर्षात विद्यापीठाचे पदार्पण

अमृत महोत्सवी वर्षात विद्यापीठाचे पदार्पण

पुणे, ता. ९ : जवळपास सात लाखांहून अधिक विद्यार्थी आणि तब्बल ७०० हून अधिक महाविद्यालयांना सामावून घेणाऱ्या अन्‌ आता अमृतमहोत्सवी वर्षात (७५ वर्ष) पदार्पण करणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोर जागतिक पातळीवरील रॅंकिंगमध्ये पहिल्या तीनशे विद्यापीठांमध्ये आपला ठसा उमटविण्याचे आव्हान आहे. तर नॅशनल इस्टिट्यूशनल रॅंकिंग फ्रेमवर्कमध्ये (एनआयआरएफ) झालेली घसरण भरून काढण्याचे आव्हानही विद्यापीठासमोर उभे आहे. या आव्हानांबरोबरच नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी विद्यापीठ अमृत महोत्सवी वर्षात काय पावले उचलणार, याकडेही शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांचे लक्ष लागले आहे.

विद्यापीठाची पार्श्वभूमी
ब्रिटिशकालीन गव्हर्नरच्या बंगल्याच्या वास्तूत पुणे विद्यापीठ सुरू होऊन तब्बल सात दशके उलटली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची (तत्कालीन पुणे विद्यापीठ) १० फेब्रुवारी १९४९ मध्ये स्थापना झाली. विद्यापीठाच्या प्रारंभी काळात विद्यापीठाला बॅरिस्टर एम. आर. जयकर, रॅंग्लर र. पु. परांजपे, प्रा. धनंजयराव गाडगीळ, रिझर्व्ह बॅंकेचे डेप्युटी गव्हर्नर डी. जी. कर्वे असे दिग्गज कुलगुरू म्हणून लाभले.

नामांतराच्या प्रक्रियेतील टप्पे
- ऑक्टोबर २०११ मध्ये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ नामकरण कृती समिती स्थापन
- २०११-२०१२ दरम्यान नामविस्ताराच्या मागणीसाठी आंदोलन
- मार्च २०१२ मध्ये छगन भुजबळ (तत्कालीन मंत्री) यांच्याकडून मिळाले आश्वासन
- ऑक्टोबर २०१३ मध्ये विद्यापीठाच्या अधिसभेत नामविस्ताराचा स्थगन प्रस्ताव
- ७ जुलै २०१४ मध्ये ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ नावाला राज्य मंत्रिमंडळाची मान्यता

विद्यापीठाची माहिती
विद्यापीठाची स्थापना : १० फेब्रुवारी १९४९
विद्यापीठाचा आवार : ४११ एकर
शैक्षणिक विभाग : ४६
संलग्न महाविद्यालये : ७०५
संलग्न परिसंस्था : २३४
संशोधन संस्था : ७१
विद्यापीठ विभागातील शिक्षक : २९३
विद्यार्थी संख्या : जवळपास सात लाख
विद्यापीठातील जयकर ग्रंथालयातील पुस्तके आणि जर्नल्स : ४,२२,०००

महाविद्यालयांचे वैभव
स्वायत्त महाविद्यालयांची संख्या : ३०
व्यावसायिक शिक्षण देणारी महाविद्यालये : ३५८
अव्यावसायिक शिक्षण देणार महाविद्यालये : ३९२
संशोधन केंद्र (महाविद्यालय/परिसंस्था/स्वायत्त) : ३१२

नॅक मानांकन प्राप्त महाविद्यालये
ए ++ : ०३
ए+ : १८
ए : १०६
बी++ : ६२
बी+ : ७६
बी : १४०

वैशिष्ट्ये
- विद्यापीठाच्या आवारात ७०० पेक्षा अधिक वनस्पतींच्या प्रजाती, त्यात ४०० औषधी वनस्पती
- देशाबाहेर दोहा-कतार येथे शैक्षणिक केंद्र स्थापनेसाठी प्रयत्न सुरू
- राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेचे (नॅक) ‘ए+’ दर्जा प्राप्त विद्यापीठ
- १०६ देशांमधील १२ हजाराहून अधिक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी

वाटचालीबाबत कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांचे म्हणणे
- विद्यापीठाला अधिक उंचीवर नेण्याचा मानस
- विद्यापीठाला जागतिक पातळीवर महत्त्व प्राप्त करून देणे
- विद्यार्थ्यांना रोजगारक्षम, उद्योगक्षम बनविणे
- नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणीची जोरदार तयारी
- क्रीडा, सामाजिक कार्यात प्रोत्साहन देणे
- जागतिक पातळीवर पहिल्या तीनशेमध्ये विद्यापीठाला नेण्यास प्रयत्नशील
- संशोधन, दुहेरी पदवी, बॅंक ऑफ क्रेडिट यासाठी प्रयत्न करणार
- आत्मनिर्भर विद्यापीठ आणि विद्यार्थी बनविणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com