‘विट्रो डायग्नॉस्टिक’ देणार जलद वैद्यकीय अहवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘विट्रो डायग्नॉस्टिक’ देणार जलद वैद्यकीय अहवाल
‘विट्रो डायग्नॉस्टिक’ देणार जलद वैद्यकीय अहवाल

‘विट्रो डायग्नॉस्टिक’ देणार जलद वैद्यकीय अहवाल

sakal_logo
By

पुणे, ता. ९ : रुग्णाच्या रक्ताचे नमुने घेऊन त्याचा प्रत्यक्ष अहवाल (रिपोर्ट) मिळेपर्यंत सध्या वाट पहावी लागते. रुग्णाला कमी वेळेत अचूक अहवाल मिळेल असे नवे तंत्र शोधून काढण्यात मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशनला यश मिळाले आहे. ‘विट्रो डायग्नॉस्टिक’ या वैद्यकीय उपकरण आणि किटमुळे हे सुविधा उपलब्ध झाली आहे. त्यामुळे लहान ते मध्यम आकाराच्या प्रयोगशाळा आणि डॉक्टरांच्या क्लिनिकमध्येही रुग्णांना वैद्यकीय चाचण्या सहज करणे शक्य होणार असल्याचे यातून स्पष्ट होते.

रुग्ण प्रयोगशाळेत जाऊन त्याचे नमुने देतो, किंवा रुग्णाच्या घरी जाऊन तंत्रज्ञ नमुने संकलित करतो. त्यानंतर हे नमुने तपासण्यासाठी केंद्रीय प्रयोगशाळेत जातात. या दरम्यान संकलित केलेल्या नमुन्याची गुणवत्ता कमी होण्याची शक्यता असते. तसेच, नमुना संकलन ते अहवाल या दरम्यान बराच वेळ जातो. रुग्णाला त्याच्या घराच्या जवळच्या प्रयोगशाळेत गुणवत्तापूर्ण वैद्यकीय अहवाल मिळेल, अशी व्यवस्था आणण्याचा प्रयत्न या नवीन तंत्रातून मायलॅबने केला आहे.

देशाच्या ग्रामीण आणि निमशहरी भागातील प्रयोगशाळा विशेष चाचणीसाठी शहरातील मोठ्या प्रयोगशाळांवर अवलंबून असतात. मात्र, छोट्या प्रयोगशाळांमध्येच विशेष रोगनिदान चाचण्या करण्याचे तंत्र विट्रो डायग्नॉस्टिकच्या माध्यमातून उभे राहिले आहे. त्यामुळे रुग्णांना घराजवळच्या प्रयोगशाळेत, कमी वेळात खात्रीशीर अहवाल मिळण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. यासाठी प्रयोगशाळेत अत्यावश्यक सर्व यंत्रणा यात नवीन तंत्रात दिल्या आहेत.

परवडणाऱ्या दरात चाचण्या!
मायलॅब डिस्कव्हरी सोल्यूशनचे कार्यकारी संचालक राजेश पटेल म्हणाले, ‘‘विट्रो डायग्नॉस्टिक रुग्ण केंद्रित आहे. या उपकरणातून रुग्णाच्या आजाराचे निदान करण्यासाठी आवश्यक प्रयोगशाळा चाचण्या अत्यंत कमी वेळेत आणि अचूक होतील. रुग्णाला परवडतील अशा दरात या उपलब्ध आहेत. त्यामुळे डॉक्टरांना या रिपोर्टच्या आधारावर रोगनिदान करून रुग्णावर तातडीने उपचार करता येतील.’’