‘वंदे भारत’ अखेर पुण्याच्या ‘ट्रॅक’वर

‘वंदे भारत’ अखेर पुण्याच्या ‘ट्रॅक’वर

Published on

पुणे, ता. ९ ः ‘वंदे भारत’च्या प्रवासाची पुणेकरांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. शुक्रवारी (ता. १०) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) स्थानकावर मुंबई-सोलापूर व मुंबई व साईनगर शिर्डी या दोन वंदे भारत एक्सप्रेसचे उद्‍घाटन होणार आहे. ही रेल्वे पुणे स्थानकावरून धावणार असल्याचे पुणेकरांना या रेल्वेने मुंबई व सोलापूरचा प्रवास करता येणार आहे. हा प्रवास वेगवान तर आहेच, शिवाय तो वेगळी अनुभूती देणारादेखील आहे. शुक्रवारी मध्य रेल्वेची पहिली व भारतातील ९ वी रेल्वे पुण्याहून धावणार आहे. ‘सकाळ’ने ५ जुलै २०२२ मध्ये पहिल्यांदा पुण्यातून वंदे भारत एक्स्प्रेस धावणार अशी बातमी दिली होती.

५ जुलै २०२२ : पुण्यातून वंदे भारत एक्स्प्रेस धावणार. घोरपडी येथे यासाठी कोचिंग डेपो उभारणार.
२७ सप्टेंबर २२ : घोरपडी येथे कोचिंग डेपो उभारण्यासाठी सर्वेक्षण पूर्ण, शिवाय रेक येण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या.
६ जानेवारी : वंदे भारत एक्स्प्रेस चालविण्यासाठी पुण्याच्या चालकांना गाझियाबाद येथे प्रशिक्षण.
१४ जानेवारी : १९ जानेवारीला मुंबईत पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते वंदे भारत एक्स्प्रेसचे उद्‍घाटन होणार होते. मात्र रेक उपलब्ध न झाल्याने हा कार्यक्रम रद्द झाला.
३१ जानेवारी २३ : वंदे भारत एक्सप्रेसची ३ फेब्रुवारीला चाचणी होणार.
३ फेब्रुवारी २०२३ : ‘वंदे भारत’ची बोरघाटात यशस्वी चाचणी. वंदे भारत रेल्वे धावण्यासाठी ही चाचणी महत्त्वाची.
९ फेब्रुवारीला : वंदे भारतचे सारस्थ पुण्यातील चालकांच्या हाती

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.