...तर निवडणुकीला सामोरे जाऊ ः पवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

...तर निवडणुकीला सामोरे जाऊ ः पवार
...तर निवडणुकीला सामोरे जाऊ ः पवार

...तर निवडणुकीला सामोरे जाऊ ः पवार

sakal_logo
By

पुणे, ता. ९ ः कसब्यातील बंडखोरी रोखण्यात महाविकास आघाडीला यश आले आहे. चिंचवडमध्ये राहुल कलाटे यांनी उमेदवारी मागे घ्यावी, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यात यश आले तर ठीक, नाही तर निवडणुकीला सामोरे जाऊ. कलाटे यांना कोणाची फूस आहे, याबाबत मला कोणतीही कल्पना नाही; मात्र ज्या वेळी कलाटे आणि माझी भेट होईल, तेव्हा मी त्यांना विचारेन, असे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी स्पष्ट केले.
पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना ते म्हणाले, ‘भाजपचे पदाधिकारी काँग्रेसच्या बाळासाहेब दाभेकर यांना भेटून राजकारण करत आहेत. आघाडीच्या नेत्यांनी बंडखोरी केली तर त्याचा फायदा भाजपला होणार. त्यामुळे आपण काळजी घ्यावी.’
शिंदे-फडणवीस सरकारने जाहिरातींवर केलेल्या खर्चाबाबत ते म्हणाले, हे सर्वसामान्यांचे सरकार आहे. जाहिरातबाजी केल्याशिवाय सर्वसामन्यांना कसे कळणार. मी अर्थमंत्री म्हणून काम केले आहे. कुठे खर्च केला पाहिजे, कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिले पाहिजे. एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस टाइम्स स्क्वेअरवर साजरा होत आहे, सर्वसामन्यांचे मुख्यमंत्री सर्वदूर पोहोचले, असा टोलाही पवार यांनी मारला. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे, त्यावर पवार यांनी ‘बेस्ट ऑफ लक’ अशा शब्दात विषय संपवला.
हिवाळी अधिवेशनात कोयता गँगबाबत प्रश्न उपस्थित केल्याने पुणे पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. कोयता गँगविरोधात तडीपार, मोक्का दाखल केले जात आहेत, असे पवार यांनी सांगितले.