हुजुरपागेच्या माजी विद्यार्थिनींनी साजरी केली आपली सत्तरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हुजुरपागेच्या माजी विद्यार्थिनींनी
साजरी केली आपली सत्तरी
हुजुरपागेच्या माजी विद्यार्थिनींनी साजरी केली आपली सत्तरी

हुजुरपागेच्या माजी विद्यार्थिनींनी साजरी केली आपली सत्तरी

sakal_logo
By

पुणे, ता. १० ः हुजुरपागेमध्ये १९६९ मध्ये मॅट्रिक झालेल्या विद्यार्थिनींनी एकत्र जमून आपली सत्तरी जोरदार साजरी केली.
शुक्रवारी पंडित फार्म येथे हा सोहळा झाला. या बॅचच्या ४७ विद्यार्थिनी जमल्या होत्या.
सर्वांना एकमेकींचा व्यवस्थित परिचय व्हावा आणि ओळख पटावी यासाठी सर्वांना पूर्वाश्रमीच्या नावाने बिल्ले दिले होते. सरस्वती पूजन करून, शाळेची प्रार्थना म्हणून कार्यक्रमाला सुरुवात झाली. अरुणा पंडित गवाणकर यांनी प्रास्ताविक केले. रंजना ओक सोमण हिने मनोगत व्यक्त केले. प्रभा लिमये जोशी व मीना दामले काळे या दोघींनी संस्कृत गीतामधून वाढदिवसाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. राजांनी म्हसकर मोघे हिने स्वरचित गीत गायले. त्यानंतर अंजली जोशी रानडे, शुभदा होनप दीक्षित, रश्मी लिमये जोशी, मेधा साठे जोशी यांनी सर्व मैत्रिणींबरोबर शाळेमध्ये शब्दरूपी फेरफटका मारला. शाळेतील शिक्षक, गॅदरिंग, खेळांच्या प्रॅक्टिस आणि स्पर्धा, हिराबागेवर स्पर्धांच्या वेळी केलेला दंगा व इतर अनेक आठवणींमध्ये रमत सगळ्याजणी शाळेतल्या मुली झाल्या होत्या. भोजनानंतर शाळेच्या कविता म्हटल्या. आरोळ्या ठोकल्या. आणि पुन्हा भेटण्याचे आश्वासन देत, नवी ऊर्जा मनात भरून घेत कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरुणा पंडित गवाणकर आणि रंजना ओक सोमण यांनी विशेष परिश्रम घेतले.