उच्चदाब वाहिनीच्या कामासाठी वाहतूक बंद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

उच्चदाब वाहिनीच्या कामासाठी वाहतूक बंद
उच्चदाब वाहिनीच्या कामासाठी वाहतूक बंद

उच्चदाब वाहिनीच्या कामासाठी वाहतूक बंद

sakal_logo
By

पुणे, ता. १० : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या पुणे वाहिनीच्या (पुणेकडे जाणाऱ्या) कळंबोली गावाजवळ ओव्हर हेड गॅन्ट्री (कमान) उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत (एमएसआरडीसी) करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक १२ फेब्रुवारीला (रविवार) दुपारी बारा ते दुपारी तीन या कालावधीत पूर्णपणे बंद करण्यात येणार आहे. या मार्गावरील वाहतूक कळंबोली गाव ते पनवेल सर्कल ते देवांश ईन हॉटेल जवळून पनवेल रॅम्पपासून पुन्हा द्रुतगती मार्गे पुणेकडे, अशी वळविण्यात येणार आहे.

काम सुरू असणाऱ्या कालावधीत द्रुतगती मार्गावरील वाहनांनी पर्यायी मार्गाचा उपयोग करावा. तसेच वरील कालावधी दरम्यान द्रुतगती मार्गावरील वाहनचालकांना काही अडचण असल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या नियंत्रण कक्षाच्या दूरध्वनी ९८२२४९८२२४ या क्रमांकावर किंवा महामार्ग पोलिस विभागाच्या ९८३३४९८३३४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रस्ते महामंडळाकडून करण्यात आले आहे.
----------