Tue, March 21, 2023

व्हॅलेंटाईन डे
व्हॅलेंटाईन डे
Published on : 14 February 2023, 10:06 am
पुणे, ता. १४ : व्हॅलेंटाइन डे’च्या निमित्ताने श्री योग वेदांत सेवा समितीच्या पुणे शाखेतर्फे अखिल मंडई मंडळाच्या प्रांगणात मातृ-पितृ पूजनाचा कार्यक्रम मंगळवारी झाला. साध्वी रेखा बहन यांच्या गीता भागवत सत्संगाचे आयोजनही करण्यात आले होते. जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, समितिचे अध्यक्ष चेतन चरवड, सचिव राकेश श्रीवास्तव, मीडिया प्रमुख सचिन परदेशी व इतर पदाधिकारी आणि सदस्य या प्रसंगी उपस्थित होते.