तीन हजार ७०७ गुन्हेगारांची तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तीन हजार ७०७ गुन्हेगारांची तपासणी
तीन हजार ७०७ गुन्हेगारांची तपासणी

तीन हजार ७०७ गुन्हेगारांची तपासणी

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : शिवजयंती, महाशिवरात्र आणि कसबा विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी घेतली. यात तीन हजार ७०७ गुन्हेगारांची तपासणी केली. त्यातील ५२१ जणांना अटक केली आहे. त्यासाठी बुधवारी मध्यरात्री विशेष मोहीम (कोम्बिंग ऑपरेशन) राबविले गेले.

पोलिस आयुक्त रितेश कुमार तसेच सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. शहरातील विविध भागांत स्थानिक पोलिस ठाणे तसेच गुन्हे शाखेतील पथकाने तपासणी केली. पोलिसांनी मोहिमेत गंभीर गुन्ह्यातील ५२१ गुन्हेगारांना ताब्यात घेऊन त्यांना अटक केली. तसेच, बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी पाच जणांना पकडले. त्यांच्याकडून शस्त्रसाठा जप्त केला आहे. अमली पदार्थ विरोधी पथकाने टांझानिया देशातील तरुणाकडून २३ लाख २६ हजारांचे कोकेन जप्त केले. तसेच, मुंढव्यातील हुक्का पार्लरवर छापा टाकला तसेच ५८१ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली.

दीड हजार वाहनचालकांची तपासणी :
नाकाबंदीत एक हजार ४८५ वाहनचालकांची तपासणी केली. त्यात नियमभंग केल्याप्रकरणी ३२ वाहनचालकांवर कारवाई केली. या सोबतच पोलिसांनी नुकतेच कारागृहातून जामीन मिळवून बाहेर पडलेल्या आरोपींनी नोटीस बजावली आहे. तसेच, शहरातील ५४४ हॉटेल व लॉज देखील तपासण्यात आले आहेत. बसथांबे, रेल्वे स्थानक, एसटी स्थानक परिसरात तपासणी मोहीम राबविली गेली.