येरवडा परिसरात भररस्त्यात तलवारीने दहशत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

येरवडा परिसरात भररस्त्यात तलवारीने दहशत
येरवडा परिसरात भररस्त्यात तलवारीने दहशत

येरवडा परिसरात भररस्त्यात तलवारीने दहशत

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : भररस्त्यात मध्यरात्री हातात तलवार घेऊन दहशत पसरविणाऱ्या तरुणाला पोलिस पथकाने समजावण्याचा प्रयत्न केला असता त्याने पथकालाच धक्काबुक्की करून धमकावले. येरवड्यातील वाडिया बंगल्यासमोरील बस थांब्यावर मंगळवारी (ता. १४) दहाच्या सुमारास हा प्रकार घडला. याप्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली.
वनराज महेंद्र जाधव (वय २०, रा. लक्ष्मीनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात सरकारी कामात अडथळा निर्माण करणे यांसह इतर कलमान्वये येरवडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सहायक पोलिस उपनिरीक्षक प्रदीप सुर्वे यांनी तक्रार दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा परिसरात पोलिस पथक पेट्रोलिंग करीत होते. गुन्हेगारांची तपासणी सुरू असताना पथकाला एक तरुण हातात तलवार घेऊन नागरिकांमध्ये दहशत पसरवीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पथक त्याला ताब्यात घेण्यासाठी गेले असता वनराज याने पोलिस पथकालाच धक्काबुक्की केली. तसेच, मी कोण आहे, असे म्हणत त्यांना धमकावले.