अमेरिकन व्हिसासाठी भारतीय विद्यार्थ्यांचे सर्वाधिक अर्ज मुंबईतील वकिलातीचे प्रमुख माईक हॅंकी यांची माहिती; कोरोनापूर्व स्थितीत अर्जप्रक्रिया | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमेरिकन व्हिसासाठी भारतीय विद्यार्थ्यांचे सर्वाधिक अर्ज
मुंबईतील वकिलातीचे प्रमुख माईक हॅंकी यांची माहिती; कोरोनापूर्व स्थितीत अर्जप्रक्रिया
अमेरिकन व्हिसासाठी भारतीय विद्यार्थ्यांचे सर्वाधिक अर्ज मुंबईतील वकिलातीचे प्रमुख माईक हॅंकी यांची माहिती; कोरोनापूर्व स्थितीत अर्जप्रक्रिया

अमेरिकन व्हिसासाठी भारतीय विद्यार्थ्यांचे सर्वाधिक अर्ज मुंबईतील वकिलातीचे प्रमुख माईक हॅंकी यांची माहिती; कोरोनापूर्व स्थितीत अर्जप्रक्रिया

sakal_logo
By

पुणे, ता. १६ : अमेरिकन व्हिसासाठी अर्ज करणाऱ्यांमध्ये भारतीय विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक असून, मागील वर्षी एक लाख २५ हजार विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते, अशी माहिती मुंबईतील अमेरिकन वकिलातीचे प्रमुख माईक हॅंकी यांनी दिली. तसेच व्हिसासाठीच्या अर्जांमध्ये वाढ होत असून, लवकरच कोरोनापूर्व स्थितीत आम्ही पोचू, असेही ते म्हणाले.

अमेरिकेच्या मुंबईतील वकिलातीचे कॉन्सूलर चीफ जॉन बलार्ड आणि हॅंकी यांनी कोथरूडच्या एमआयटीमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. पुण्यातील शिक्षणसंस्था, उद्योगांना भेट देण्यासाठी ते पुण्यात आले होते. तसेच अमेरिकी नागरिकत्व असलेल्या आणि पुण्यात राहणाऱ्या नागरिकांशी त्यांनी एमआयटीमध्ये संवाद साधला. डिसेंबरपासून तीन लाख नव्या व्हिसासाठीच्या मुलाखतींसाठी वेळा देण्यात आल्याचे बॅलार्ड यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘व्हिसा प्रक्रिया गतिमान करण्यासाठी वकिलाती कटिबद्ध आहे. डिसेंबरपासून व्हिसासाठीच्या तीन लाख नव्या मुलाखतींसाठी वेळ देण्यात आली. त्या दृष्टीने जगभरातील अधिकाऱ्यांची मदत घेण्यात येत आहे. विद्यार्थी व्हिसा, कामाला जाण्यासाठीचा व्हिसा आणि मानवतावादी व्हिसा या तीन व्हिसांसाठीच्या प्रक्रियेचा प्रतीक्षा कालावधी कमी करण्यात आला आहे.’’

मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन
अमेरिकेत शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांपैकी ४० टक्के विद्यार्थी विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (स्टेम) शिक्षणासाठी जातात. त्यात मुलींचे प्रमाण ४० टक्के आहे. सर्वोत्कृष्ट दर्जाचे शिक्षण, प्रात्यक्षिकावर आधारित शिक्षण अमेरिकेत मिळत असल्याने विद्यार्थ्यांची अमेरिकेला पसंती आहे. अमेरिका आणि भारताचे उत्तम संबंध आहेत. भारतातील अनेक कुटुंबे, विद्यार्थ्यांना अमेरिकेत यायचे असते. प्रत्येक पात्र विद्यार्थ्याला व्हिसा दिला जातो, असेही हॅंकी यांनी सांगितले.