महाशिवरात्रीला पीएमपी सोडणार २० अतिरिक्त बस

महाशिवरात्रीला पीएमपी सोडणार २० अतिरिक्त बस

पुणे, ता.१६ : पीएमपी प्रशासनाने प्रवाशांच्या सोयीसाठी महाशिवरात्री निमित्त शनिवारी (ता. १८) पीएमपीच्या महत्त्वाच्या बस स्थानकांवरून अतिरिक्त बस सोडण्याचे नियोजन केले आहे. निळकंठेश्वर (रूळेगांव), बनेश्वर (नसरापूर), घोरावाडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी) या ठिकाणी जाण्यासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. हे लक्षात घेऊन पीएमपी प्रशासनाने या मार्गावर जास्तीच्या गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. यावेळी पीएमपीच्या नियमित बस देखील प्रवाशांच्या सेवेत असणार आहेत. स्वारगेट, कात्रज, निगडी या तीन स्थानकावरून ह्या बस धावणार आहेत.

या मार्गावर धावणार गाड्या :
१. कात्रज सर्पोद्यान ते बनेश्वर (चेलाडी फाटापर्यंत)
२. स्वारगेट मुख्य स्थानक ते निळकंठेश्वर (रूळेगांव)
३. निगडी (पवळे चौक) ते घोरावाडेश्वर मंदिर पायथा (शंकरवाडी)

कात्रज सर्पोद्यान येथून बनेश्वर (चेलाडी फाटा) येथे जाण्याकरिता पहिली फेरी पहाटे ५.३० वाजता यात्रेसाठी दोन जादा क्रु व पर्यायी बसमार्ग क्रमांक ६१-कात्रज ते सारोळा, बसमार्ग क्रमांक २९३-कात्रज सर्पोद्यान ते सासवड मार्गे कापूरहोळ, बसमार्ग क्रमांक २९३-कात्रज सर्पोद्यान ते विंझर व बसमार्ग क्रमांक २९६ अ-कात्रज सर्पोद्यान ते वांगणीवाडी या मार्गांवर ११ बसेस सरासरी २० मिनिटाच्या अंतराने धावणार आहेत. तसेच स्वारगेट मुख्य स्थानकावरून निळकंठेश्वर (रूळेगांव)ला जाण्यासाठी पहाटे ३.३० वाजता निघणार आहे. शिवाय अन्य काही बस उर्वरित बस स्थानकावरून धावणार असल्याचे पीएमपी प्रशासनाने सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com