वोटर स्लीपचे वाटप सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वोटर स्लीपचे वाटप सुरू
वोटर स्लीपचे वाटप सुरू

वोटर स्लीपचे वाटप सुरू

sakal_logo
By

पुणे, ता. १७ : कसबा पोटनिवडणुकीसाठी मतदारांना घरपोच मतदार चिठ्ठीचे (वोटर स्लीप) वाटपाच्या कामास जिल्हा प्रशासनाकडून शुक्रवारपासून सुरुवात करण्यात आली. कसब्यात दोन लाख ७५ हजार मतदार असून, या मतदारांना मतदार चिठ्ठ्या घरोघरी देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

येत्या २६ तारखेला होणाऱ्या मतदानाच्या दृष्टीने प्रशासनाची तयारी सुरू असून, गटस्तरावर नियुक्त करण्यात आलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तसेच समन्वयक अधिकाऱ्यांमार्फत मतदारांना घरपोच मतदार चिठ्ठीचे वाटप करण्यात येणार आहे. मतदारांना मतदान केंद्र कुठे आहे, याबाबत माहिती देण्यात येत आहे. कसबा मतदारसंघात एक लाख ३६ हजार ८७३ पुरुष, तर एक लाख ३८ हजार ५५० महिला तर तृतीयपंथी पाच असे मिळून एकूण दोन लाख ७५ हजार ४२८ एकूण मतदार आहेत. या मतदारांना चिठ्ठी वाटपास सुरुवात करण्यात आली असून, २० फेब्रुवारीपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन आहे. या मतदारसंघातील मतदार निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहू नये, यासाठी निवडणूक यंत्रणेद्वारे विशेष नियोजन केले जात आहे.

दरम्यान, शुक्रवारी १०८ मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांनी मतदार चिठ्ठी वाटपास सुरुवात केली आहे. शनिवार-रविवार या दोन दिवसांत जास्तीत जास्त चिठ्ठी वाटपाचे नियोजन करण्यात आल्याचे कसबा निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडून सांगण्यात आले.