पंधरा वर्षावरील वाहनांचे पासिंग महागले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंधरा वर्षावरील वाहनांचे पासिंग महागले
पंधरा वर्षावरील वाहनांचे पासिंग महागले

पंधरा वर्षावरील वाहनांचे पासिंग महागले

sakal_logo
By

पुणे, ता. १८ : पंधरा वर्षांवरील वाहनांचे फिटनेस सर्टिफिकेट काढणे आता वाहनचालकांना चांगलेच महागात पडणार आहे. जुन्या वाहनांच्या फिटनेस पासिंग शुल्कामध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. १ एप्रिलपासून नव्या शुल्काची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे जुने वाहन वापरणे वाहनचालकांना आता महागात पडणार आहे.

वाहनाचा प्रकार सध्याचे शुल्क नवे शुल्क
ट्रक ३०० १३०००
टेम्पो ६०० ७५००
रिक्षा ६०० ३५००
दुचाकी ३०० १९५०
चारचाकी ६०० ६०५०

परिवहन मंत्रालयाने १५ वर्षांवरील जुन्या वाहनांच्या योग्यता प्रमाणपत्रासंदर्भात नवीन शुल्क ठरविले आहे. त्याची अंमलबजावणी १ एप्रिलपासून होणार आहे.
- डॉ. अजित शिंदे, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे

सरकारने मोठ्या प्रमाणात शुल्कात वाढ केली आहे. ती सर्वसामान्य नागरिक व वाहतूकदारांना आर्थिकदृष्ट्या परवडणारी नाही. यामुळे छोटे वाहतूकदार अडचणीत येतील.
- बाबा शिंदे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य वाहन चालक मालक संघटना, पुणे