अक्षर दिवाळी अंकास सर्वोत्तम अंक पुरस्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अक्षर दिवाळी अंकास
सर्वोत्तम अंक पुरस्कार
अक्षर दिवाळी अंकास सर्वोत्तम अंक पुरस्कार

अक्षर दिवाळी अंकास सर्वोत्तम अंक पुरस्कार

sakal_logo
By

पुणे, ता. २० ः पुण्यभूषण फाउंडेशनतर्फे दरवर्षी सर्वोत्तम दिवाळी अंकास दिला जाणारा ‘पुण्यभूषण सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्कार’ यंदा ‘अक्षर’ या दिवाळी अंकास जाहीर झाला आहे. तसेच, दिवाळी अंकातील उत्तम साहित्यासाठीचे पुरस्कार सुरेंद्र दरेकर, बालाजी सुतार आणि सुनीता डागा यांना जाहीर झाले आहेत.
पुण्यभूषण फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. सतीश देसाई यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. मराठी भाषा दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे रविवारी (ता. २६) सायंकाळी ५.३० वाजता नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात प्रसिद्ध लेखक मिलिंद बोकील आणि ‘सकाळ’चे संपादक-संचालक श्रीराम पवार यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचा वितरण सोहळा होणार आहे.
एक लाख रुपये आणि सन्मानपत्र, असे सर्वोत्तम दिवाळी अंक पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘अक्षर’ या दिवाळी अंकाचे संपादक मीना कर्णिक आणि हेमंत कर्णिक हा पुरस्कार स्वीकारतील. लेखकांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे स्वरूप प्रत्येकी रुपये अकरा हजार आणि मानपत्र, असे आहे. २०२२ मध्ये प्रकाशित झालेल्या दिवाळी अंकातून दहा वाचन स्वयंसेवकांनी प्राथमिक गुणांकन करून निवड केली. त्यानंतर ज्येष्ठ लेखक-विचारवंत हरी नरके, कवयित्री नीरजा, संजय भास्कर जोशी, रेखा साने-इनामदार आणि नितीन वैद्य यांच्या निवड समितीने सर्वोत्तम दिवाळी अंकाची निवड केली.