लाचखोर सहायक आयुक्तांना कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लाचखोर सहायक आयुक्तांना कोठडी
लाचखोर सहायक आयुक्तांना कोठडी

लाचखोर सहायक आयुक्तांना कोठडी

sakal_logo
By

पुणे, ता. २१ : लॅक्टोज विक्री परवान्यासाठी दहा हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या अन्न व औषध प्रशासन विभागातील सहायक आयुक्तांची रवानगी पोलिस कोठडीत झाली आहे. न्यायालयाने त्यांना २३ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. अन्न व औषध प्रशासन विभागाचे (अन्न) सहायक आयुक्त साहेब एकनाथराव देसाई असे अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्याचे नाव आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना सोमवारी (ता. २०) सापळा लावून अटक केली आहे. तक्रारदार यांनी त्यांच्या कंपनीमार्फत लॅक्टोज विक्रीचा परवाना मिळण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाकडे अर्ज केला होता. हा अर्ज मंजूर करून परवाना देण्यासाठी साहेब देसाई यांनी तक्रारदाराकडे दहा हजार रुपयांची मागणी केली होती. या तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता देसाई यांनी तक्रारदाराकडे लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने देसाई यांना लाच स्वीकारताना रंगेहाथ ताब्यात घेतले. या प्रकरणी सोमवारी रात्री उशिरा चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक भारत साळुंखे तपास याचा तपास करत आहेत.