Wed, March 29, 2023

पोस्ट सोसायटीच्या
अध्यक्षपदी वालगुडे
पोस्ट सोसायटीच्या अध्यक्षपदी वालगुडे
Published on : 22 February 2023, 10:37 am
पुणे, ता. २२ ः पुणे पोस्ट अँड टेलिकॉम को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या अध्यक्षपदी उमाकांत वालगुडे, उपाध्यक्षपदी राजेंद्र तुपे तर, सचिवपदी गणेश भोज यांची बिनविरोध निवड झाली. संचालक मंडळाच्या नुकत्याच पार पडलेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये संघर्ष पॅनेलचे सर्व २१ संचालक निवडून आल्यानंतर संस्थेच्या पदाधिकारी निवडीची सभा नुकतीच झाली. याप्रसंगी संस्थेचे मावळते अध्यक्ष दीपक धुमाळ, उपाध्यक्ष भानुदास कोलते, तज्ज्ञ संचालक नागेशकुमार नलावडे व ज्येष्ठ मार्गदर्शक दिलीप जगदाळे, अरविंद शिवतरे यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले.