मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी कार्यक्रम
मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी कार्यक्रम

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी कार्यक्रम

sakal_logo
By

पुणे, ता. २३ : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने निर्धार केला आहे. त्यासाठी स्वीप मोहिमेंतर्गत गुरूवारी मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्या उपस्थितीत शनिवारवाड्यावर जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित करण्यात आला. तसेच मतदारसंघात भेट देऊन मतदान करण्यासाठी मतदारांना माहिती देण्यात येणार आहे.

मतदारांना यादीतील नाव शोधण्यापासून ते मतदान केंद्रांवर पोहोचविण्यासाठी सर्व व्यवस्था करण्यात आली असून सुट्टीच्या दिवशी मतदान असल्याने जास्तीजास्त मतदारांनी तसेच नवमतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनीही केले आहे. जिल्ह्यात सर्वात कमी दोन लाख ७५ हजार ६७९ मतदारसंख्या असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून रविवारी प्रत्यक्ष मतदान होणार आहे. सर्वाधिक सुशिक्षित मतदार या मतदारसंघात असले, तरी प्रत्यक्ष मतदानाचा टक्का वाढत नाही. येथे प्रथमच ८० वर्षांपुढील मतदारांसाठी पोस्टल मतदानाची सोय उपलब्ध करून दिली आहे. मतदारसंघात २७० मतदान केंद्र आहेत. स्वीप मोहिमेंतर्गत वंचित घटकांसाठी विशेष मतदार जनजागृती व्याख्याने, शालेय विद्यार्थ्यांच्या फेरी, कार्यशाळा, चर्चासत्र, प्रश्‍नमंजुषा, प्रात्यक्षिके, रांगोळी-चित्रकला-फलक स्पर्धा आयोजित केल्या आहेत. तसेच मतदार यादीत सहज नाव शोधण्यासाठी केवायसी (नो युवर कॅन्डिडेट) अ‍ॅप तयार करण्यात आले आहे.